MP Assembly Election : जगाच्या पाठीवर मराठी माणूस नाही, असा प्रदेश नाही. त्या प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाने आपली छाप सोडली आहे. भोपाळमध्ये आपापले संघटन करून उभा असलेला माणूस विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीमागे असल्याचे दिसतो आहे. शहरात सुमारे एक लाख मतदार आहे.
मध्यप्रदेश तर महाराष्ट्राच्या सीमेला लागूनच इंदौरमध्ये मोठा मराठी समाज असून, मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मराठी माणूस आहे.
शिवकाल व नंतर पेशवे काळापासून महाराष्ट्राचा इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेरपर्यंत मराठी समाज आलेला आहे. (Marathi people in Bhopal backs BJP in MP Assembly Election news)
तर गेल्या शे-सव्वाशे वर्षात नोकरी, व्यवसाय निमिताने मराठी माणूस भोपाळमध्ये स्थायिक झाला आहे. आज हा समाज राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. भोपाळ शहरातील सात मतदारसंघांपैकी जुने भोपाळ मतदारसंघ वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचा टक्का चांगला आहे. हा वर्ग प्रामुख्याने भाजपाला पाठिंबा देताना दिसतो आहे.
महाराष्ट्र मंडळ
भोपाळ मधील नरेला विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विश्वास नारंग मैदानात आहे. याच मतदारसंघात असलेल्या गौतम नगर भागात महाराष्ट्र मंडळ या नावाची मराठी माणसांची संघटना आहे. सुमारे 168 मराठी कुटुंबीयांची ही संघटना 40 वर्षांपूर्वी स्थापन झालेली आहे.
गणेश उत्सवासह दिवाळी, पहाट पाडवा आणि वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटना मराठी माणसांना एकत्रित ठेवण्याचे काम करते आहे.
या संघटनेला भाजपाचे पाठबळ आहे. त्यामुळे आज गौतम नगर भागात असलेल्या बुथवर मराठी माणूस आवर्जून उपस्थित असताना दिसला आणि मराठी माणसाचे पूर्णपणे मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसले.
भोपाळमधील मराठी संघटना
महाराष्ट्र मंडळ गौतमनगर, समग्र मराठी समाज, मध्यप्रदेश चित्पावन संघ, समस्त महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज तुळशीनगर, मानसरोवर महाराष्ट्र मंडळ शाहपुरा आदी.
"महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मराठी समाज एकसंघपणे काम करतो. राज्यात पुन्हा भाजप सरकार येण्यासाठी मंडळाने प्रयत्न केले आहेत." - रवींद्र जोशी, भोपाळ
"भाजपच्या योजना, विकास कामांमुळे राज्याने विकास साधला आहे. विशेषतः महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत." - कैलास यादव, विभागप्रमुख, गौतमनगर, भाजप, नरेला मतदारसंघ, भोपाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.