वैवाहिक बलात्कार सुद्धा घटस्फोटाचा आधार ठरु शकतो, केरळ हायकोर्ट

या प्रकरणात नवऱ्याची संपत्ती आणि शरीरसुखासाठी लालसेमुळे पत्नीला घटस्फोटाच्या निर्णयाप्रत येण्यास भाग पडले आहे.
rape case
rape case File photo
Updated on

नवी दिल्ली: वैवाहिक नात्यातील (marriage relation) लैंगिक संबंधांबद्दल केरळ उच्च न्यायालयाने (Kerala high court) शुक्रवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. पत्नीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक कृती करणं (sexual relationship) हा बलात्कार आहे आणि घटस्फोट (divorce) घेण्यासाठी हा सुद्धा एक आधार ठरु शकतो असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

"या प्रकरणात नवऱ्याची संपत्ती आणि शरीरसुखासाठी लालसेमुळे पत्नीला घटस्फोटाच्या निर्णयाप्रत येण्यास भाग पडले आहे. नवऱ्याचा वासनाधपणा आणि उधळपट्टी करणारे वर्तन सामान्य वैवाहिक आयुष्याचा भाग आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात जोडीदाराची संपत्ती आणि शरीससुखासाठीची लालस क्रौर्याचाच एक भाग आहे, असे म्हणण्यात आम्हाला अजिबात अडचण नाही" असे न्यायाधीश मुहम्मद मुस्तकी आणि न्यायाधीश कौसर इदाप्पागाथ यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

rape case
'कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका'; फडणवीस माध्यमांवर भडकले

कौटुंबिक न्यायालयाने क्रौर्याच्या आधारावर पत्नीला घटस्फोटाची याचिका दाखल करण्यास अनुमती दिली होती. नवऱ्याने त्यावर आक्षेप घेत वरिष्ठ कोर्टात धाव घेतली. पण केरळ उच्च न्यायालयाने नवऱ्याची याचिका फेटाळून लावली. "पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती लैंगिक कृती करणं हा सुद्धा एक बलात्कारच आहे" असं कोर्टाने म्हटलं आहे.

rape case
सेटवर अचानक कोसळली नुशरत भरुचा; रुग्णालयात केलं दाखल

कायदा वैवाहिक बलात्कार समजत नाही. याचा अर्थ न्यायालय घटस्फोटाच्या आधारासाठी या प्रकाराला क्रौर्य समजणार नाही, असा होत नाही. त्यामुळे "आमच्या दृष्टीने घटस्फोटासाठी वैवाहिक बलात्कार सुद्धा एक आधार आहे" असे कोर्टाने स्पष्ट केलं. "नवऱ्याच्या संपत्ती आणि शरीरसुखासाठीच्या अतिहव्यासामुळे महिला त्रासली होती. महिलेला काहीही करुन घटस्फोट हवाय. त्यासाठी ती मिळणाऱ्या सर्व आर्थिक लाभांवरही पाणी सोडायला तयार आहे. घटस्फोटाची या महिलेची लढाई न्यायाच्या या मंदिरात दशकभरापेक्षा जास्त काळ लांबली" असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.