नवी दिल्ली: कामासाठी युकेला जात असल्याचे पत्नीला सांगितले. पण, मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला आणि त्याला कोरोनाची लागण झाली. बायकोला आता काय सांगायचे, याची काळजी त्याला लागली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक 30 वर्षीय व्यक्तीने कामासाठी युकेला जात असल्याचे पत्नीला सांगितले. पण, युकेला न जाता मैत्रिणीला घेऊन तो इटलीला गेला होता. माघारी परतल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला होता. यामुळे त्याने रुग्णालय घाटले. तपासणी केल्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांना त्याने मैत्रिणीसोबत इटलीला फिरायला गेल्याचे सांगितले. पण, पत्नीला सांगू नका म्हणून त्याने विनंती केली. नवरा युकेला गेल्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे, असे पत्नी सांगत आहे. पण, नवऱयाला कोरोना पेक्षा आपले भिंग तर फुटणार नाही, याची काळजी लागली आहे.
दरम्यान, चीननंतर इटलीला कोरोणाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. इटलीमध्ये बुधवारी (ता. 18) एकाच दिवसात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात करोनामुळे एका दिवसात एवढे बळी गेल्याची जगातील ही पहिली घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.