बांसवाडा जिल्ह्यातील एका गावात रात्रीच्या दरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सहा महिन्यांपूर्वी एका विवाहितेने पतीला सोडून प्रियकरासह पळ काढला होता मात्र विवाहितेने रात्री प्रियकरासह पहिल्या पतीच्या घरी पोहोचून गोंधळ घातला. हा गोंधळ पाहून ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आणि चक्क प्रियकर आणि विवाहितेला लोखंडी खांबाला बांधले. ही संपूर्ण घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले. (married woman come with lover to ex husband house in rajasthan read what happened)
राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. खमेरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकरासह सासरच्या घरी पोहचत गोंधळ घातला. पतीने दुसरं लग्न केल्याची शंका तीला होती. त्यामुळे या विवाहित महिलेने सासूवर चाकूने हल्ला केला.
विवाहितेचा पती राहुल म्हणतो की, तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न बड़ी पडाल येथील घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या अंजली बुनकरशी झाले होते. लग्नानंतर पत्नी अंजली एका एनजीओमध्ये बीए करून शिवणकाम शिकत होती.
दरम्यान,तीची ओळख डुंगरपूर येथील मुंगेड गावात राहणाऱ्या आकाश व्यास याच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली, त्यानंतर सुमारे 6 महिन्यांपूर्वी अंजलीने राहुलला सोडून प्रियकर आकाशसोबत लग्न केले. राहुलच्या कुटुंबीयांनी आणि अंजलीच्या माहेरच्या लोकांनी अंजलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांना दिली होती.मात्र त्यानंतर अंजली प्रियकरासोबत पळून गेल्याची बाब समोर आली.
पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर राहुल नैराश्यात जगू लागला. त्यानंतर अंजलीच्या वडिलांनी राहुलला दुसऱ्यांदा लग्न करण्याची परवानगी दिली आणि राहुलचा २० जून रोजी विवाह झाला. अंजलीला हा प्रकार कळताच तिने प्रियकर आकाश याच्यासोबत २० जून मंगळवारी रात्री ९ पहिला पती राहुल याच्या घरी पोहोचून गोंधळ घातला. अंजलीने गोंधळ घातल्यानंतर गावकऱ्यांनी तिला आणि तिचा प्रियकर आकाशला दोरीने लोखंडी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणाला शांतपणे हाताळत दोघांनाही ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.