भोंग्यांबाबत न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा : CM बोम्मई

Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रात भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या मनसेनंही आक्रमक भूमिका घेतलीय.

बंगळुरु (कर्नाटक) : सध्या देशात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद लाऊडस्पीकरचा (Mosque loudspeaker) वाद चांगलाच गाजत आहे. महाराष्ट्रात देखील भोंग्यांबाबत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेनंही आक्रमक भूमिका घेतलीय. तर, उत्तर प्रदेशात मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. त्यातच आता मशिदींमध्ये भोंग्यांच्या बेकायदेशीर वापराविरुद्ध कर्नाटकातील (Karnataka) काही हिंदू संघटनांनी सोमवारी मोहीम हाती घेतली. या संबंधात काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची भेट घेतल्यानंतर, भोंग्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, पोलीस, गृह विभाग आणि कायदा मंत्रालय यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठकही घेतली. यापूर्वी सोमवारी, मशिदींतील भोंग्याविरोधात कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून श्रीराम सेनेसह (Shriram Sene) हिंदू संघटनांनी चालवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या निरनिराळ्या भागांतील मंदिरांमध्ये हनुमान चालीसा, सुप्रभात, ओंकार व भक्तिगीते वाजवण्यात आली.

Basavaraj Bommai
मोदींनी दोन भारत बनवले, एक श्रीमंतांसाठी अन् दुसरा गरीबांसाठी : राहुल गांधी

पहाटे 5 वाजताच्या सुमारास मशिदीतील भोंग्यांवरून ऐकू येणाऱ्या अजानला प्रत्युत्तर म्हणून, मंदिरात हजर असलेल्या लोकांनी ध्वनिमुद्रित गाणी किंवा भजने म्हटली. बंगळूरु, हुबळी, बेळगाव, मैसुरू, चिक्कमंगळुरू, यादगीर, मंड्या व कोलार यांसह इतर ठिकाणी अशा घटना घडल्या. बंगळूरुसह काही ठिकाणी पोलिसांनी काही हिंदू कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ‘अजान मुद्द्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेश असून ते सर्वांना लागू आहेत. त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात अंमलबजावणी केली जायला हवी. इतर राज्यांत काय झाले आहे, ते आम्ही पाहिले आहे,’ असं बोम्मई म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()