पाच वर्षांखालील मुलांसाठी मास्कची शिफारस नाही - आरोग्य मंत्रालय

६ ते ११ वयोगटातील मुले पालकांच्या देखरेखीत मास्कचा वापर करू शकतात
Mask Not recommended for Children
Mask Not recommended for Children google
Updated on

देशात कोरोनाची रूग्णसंख्या (Covid19 New Cases) दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोनाविषयी खबरदारी बाळगण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) पुरेपूर प्रयत्न करत आहे. आता केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुले आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) वयोगटासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Mask Not recommended for Children)

Mask Not recommended for Children
Video: कमी घेतली तर दारु औषधी असते

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वेमध्ये कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉइड्सचा वापर करत असाल तर जात असेल तर ​​​​सुधारणेच्या आधारावर १० ते १४ दिवसांमध्ये डोस कमी करावा. ५ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस नाही, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सोबत ६ ते ११ वयोगटातील मुले पालकांच्या देखरेखीत मास्कचा वापर करू शकतात तर १२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांनी मास्क वापरला पाहिजे, असे स्पष्टपणे मार्गदर्शक तत्वे मध्ये सांगितले आहे.

अन्य देशातील आकडेवारीनुसार ओमिक्रॉन वेरियंटमुळे होणारा संसर्ग हा गंभीर नाही मात्र तरीसुध्दा काळजी घेणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.