Himachal Pradesh Fire : हिमाचलमध्ये अत्तर निर्मिती कारखान्यास भीषण आग! ३३ जणांनी इमारतीवरून मारल्या उड्या

Himachal Pradesh Fire : सौंदर्यप्रसाधने आणि अत्तर तयार करणाऱ्या अरोमा कारखान्याला शुक्रवारी भीषण आग लागली.
massive fire broke out at Aroma factory which manufactures cosmetics perfumes in Himachal Pradesh
massive fire broke out at Aroma factory which manufactures cosmetics perfumes in Himachal Pradesh
Updated on

सोलन (पीटीआय): सौंदर्यप्रसाधने आणि अत्तर तयार करणाऱ्या अरोमा कारखान्याला शुक्रवारी भीषण आग लागली. आगीची तीव्रता भयावह असल्याने १८ तासानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करता आला नाही. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. या दुर्घटनेत १३ जण बेपत्ता असून ४१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

कारखान्यातील आगीत ३३ जण जखमी झाले आहेत. आगीपासून बचाव करण्यासाठी ३३ जणांनी इमारतीवरून उड्या मारल्या आणि त्यामुळे ते जखमी झाले. त्याचवेळी २० कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुराचे लोट आणि आगीच्या झळांपासून वाचण्यासाठी कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर गेले आणि सैरावैरा पळू लागले. चारमजली असलेल्या इमारतीवरून काहींनी उड्या मारल्या.

massive fire broke out at Aroma factory which manufactures cosmetics perfumes in Himachal Pradesh
Ganpat Gaikwad Firing Video : आधी गोळ्या झाडल्या अन् मग... पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीपर्यंत ९० टक्के आग नियंत्रणात आणली. मात्र उष्णता आणि भिंत ढासळण्याच्या भीतीने पथकाला इमारतीत जाता आले नाही. या घटनेची माहिती कळताच पोलिस महासंचालक संजय कुंडू यांच्यासह सोलन जिल्ह्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या उद्योगाच्या व्यवस्थापकाला तसेच कामगार देणाऱ्या कंत्राटदारांना ठाण्यात पाचारण करण्यात आले आहे. आगीची घटना घडली तेव्हा इमारतीत १०० कर्मचारी होते आणि त्यातील बहुतांश महिला होत्या. आगीचे कारण समजू शकले नाही. उद्योगात रासायनिक पदार्थांचा साठा असल्याने अनेक स्फोट झाले.

massive fire broke out at Aroma factory which manufactures cosmetics perfumes in Himachal Pradesh
Ganpat Gaikwad Firing : हे काही पहिल्यांदाच नाही! भाजप आमदाराच्या फायरिंगनंतर आदित्य ठाकरेंनी यादीच सांगितली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.