नवी दिल्ली- उत्तर भारतात रेल्वे मालगाडीला दोन ठिकाणी अपघात झाला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरले आहेत. मथुरामध्ये तब्बल 25 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले, तर बिहारच्या मुजफ्फरपुर मध्ये मालगाडीचे चार डबे घसरले आहेत. दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही . दोन्ही घटनांमुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक मात्र बदलले आहे.
उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये २५ डब्बे रुळावरून घसरले. वृंदावन रेल्वे स्टेशनपासून ८०० मिटर अंतरावर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या नियोजित गाड्यांना अडथळा निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताचा १५ रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. दुसरीकडे, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये झालेल्या अपघातामुळे देखील काही रेल्वे गाड्यांचे नियोजन कोलमडले आहे.