Matrubhasha Din 2023 : भारता विषयी विविधतेत एकता मानणारा आपला देश आहे हे आपण ज्या गर्वाने सांगतो त्याचा पुरावा आपल्याकडे बोलल्या जाणाऱ्या मातृभाषांच्या विविधतेतून समोर येतं. आपल्याकडे थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १९ हजार ५६९ भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात.
एका जनगणणा अहवालातून असं लक्षात आलं आहे की, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मातृभाषा ही वेगवेगळी आहे. त्यामुळे देशभरात मातृभाषा म्हणून बोलल्या जाणाऱ्या १९,५६९ भाषा किंवा बोली आहेत, असे जनगणनेतून समोर आले आहे. असे असले तरी देशातील ९६.७१ टक्के लोकसंख्येची मातृभाषा ही अनुसूचित समाविष्ट असलेल्या २२ भाषांपैकी एक आहे. भारतात १२१ भाषा अशा आहेत ज्या दहा हजारांहून अधिक नागरिक बोलतात.
अनुसूचित समाविष्ट नसलेल्या भाषांची संख्या २००१च्या जनगणनेत १०० होती, ती २०११च्या जनगणनेमध्ये ९९ झाली आहे. नागरिक ज्या भाषेतून किंवा बोलीतून संवाद साधतात तिची मातृभाषा म्हणून जनगणनेवेळी नोंद करण्यात आली आहे. या भाषेचे संबंधित नागरिकांना संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही.
हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
अनुसूचित समाविष्ट भाषा
आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृती, सिंधी, तमीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली, डोग्री
९९ - अनुसूचित समाविष्ट नसलेल्या भाषा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.