बजरंगबलीला दलित म्हटल्याप्रकरणी योगींना न्यायालयाची नोटीस

एका रॅलीला संबोधित करताना म्हटले होते, की बजरंगबली वनवासी आणि दलित होते.
 योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथesakal
Updated on

लखनौ : योगी आदित्यनाथ यांना मऊ न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बजरंगबलीला दलित म्हटल्या प्रकरणी सदरील नोटीस पाठवण्यात आली आहे. मऊ येथील रहिवाशी नवलकिशोर शर्मा यांनी या प्रकरणी धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. जिल्हा आणि सत्र न्यायाधीस रामेश्वर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार असल्याचे सांगितले. शर्मा यांनी न्यायाधीस श्वेता चौधरी यांच्या न्यायालयात एक तक्रार दाखल केली होती. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर आरोपी करण्यात आले होते. (Mau Court Issued Notice To Yogi Adityanath For Calling Bajrangbali As Dalit)

 योगी आदित्यनाथ
बिरभूम घटनेची कलकत्ता उच्च न्यायालयाने घेतली दखल, आज घेणार सुनावणी

शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे, की योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील मालखेडात २८ नोव्हेंबर २०१८ रोजी विधानसभा निवडणुकी दरम्यान एका रॅलीला संबोधित करताना म्हटले होते, की बजरंगबली वनवासी आणि दलित होते. यामुळे वर्मा आणि बजरंगबलीवर आस्था असणाऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. न्यायाधीश श्वेता चौधरी यांनी ११ मार्च रोजी घटनास्थळ राजस्थानमध्ये आहे आणि हे मऊ क्षेत्राधिकाराच्या बाहेर असल्याचे सांगत सदरील प्रकरणाची सुनावणी फेटाळली होती.

 योगी आदित्यनाथ
'मोदी आणि शहा हे केवळ लक्षणे, मूळ आजार तर नागपूरमध्ये आहे'

यास नवलकिशोर वर्मा यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालय या प्रकरणाची सुनावणी २६ एप्रिल रोजी घेणार आहे. न्यायालयाने योगी आदित्यनाथसह इतरांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.