गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! मदरशात फॉर्म भरण्याच्या बहाण्याने सातवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; मौलानाला 10 वर्षांचा कारावास

कानपूरमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी बातमी समोर आलीये.
Fatima Madrasa
Fatima Madrasaesakal
Updated on
Summary

पीडितेसह आठ साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयानं मौलानाला शिक्षा सुनावली.

कानपूरमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी बातमी समोर आलीये. येथील मदरशात फॉर्म भरण्याच्या बहाण्याने सातवीच्या विद्यार्थिनीवर (School Student) बलात्कार करणाऱ्या मौलानाला विशेष न्यायाधीश सुरेंद्र पाल सिंग यांनी शिक्षा सुनावली आहे. तर, दोन शिक्षकांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Fatima Madrasa
Hajj Pilgrims : उष्माघातामुळं तब्बल 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; कोल्हापुरातील 444 हज यात्रेकरू सुखरूप

न्यायालयाने (Court) मौलानाला 10 वर्षांचा कारावास आणि 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, पीडितेला दंडातून 50 हजार रुपये मिळतील. विशेष सरकारी वकील चंद्रकांत शर्मा यांनी सांगितलं की, कानपूर देहाटमधील अकबरपूर येथे राहणारे मोहम्मद जावेद गुलशन हे फातिमा मदरशात (Fatima Madrasa) मौलाना म्हणून कार्यरत होते.

9 जून 2019 रोजी त्याने फॉर्म भरण्याच्या बहाण्याने अलिमा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनीला घरातून मदरशात नेलं होतं. तिथं मौलानानं विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मौलाना मोहम्मद जावेद, शिक्षक अब्दा इस्लाम आणि शीबा उर्फ ​​शिफा यांच्या विरोधात नौबस्ता पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात पाठवलं होतं.

Fatima Madrasa
Jhadani Case : झाडाणीतील तब्बल 620 एकर जमीन गुजरातच्या GST आयुक्तांकडून खरेदी; 'त्या' नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द

दरम्यान, पीडितेसह आठ साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयानं मौलानाला शिक्षा सुनावली. तर, पुराव्याअभावी दोन्ही शिक्षकांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील शर्मा यांनी सांगितलं की, 'फॉरेन्सिक तपासणी अहवालात आरोपीच्या लुंगी आणि पीडितेच्या कपड्यांमध्ये मानवी वीर्य आणि रक्त आढळलं. वैद्यकीय अहवालातही याची पुष्टी झाली आहे. त्या आधारे न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.