जयपूर : राजस्थानातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षही आता अॅक्टिव्ह झाले आहेत. यामध्ये बसपा सुप्रिमो मायावतींचाही समावेश आहे. तसेच भाजपाकडूनही राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. राजस्थानात सध्या काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडं अशोक गेहलोतांचा गट तर दुसरीकडे सचिन पायलटांचा. दोन्ही गटांमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरुन खेचाखेची सुरु झालीए. (Mayawati Active during Political Crisis in Rajasthan need to know plan of BSP and BJP)
राजस्थानातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मायावतींचे भाचे आकाश आनंद यांनी काही महत्वाच्या निर्णयाचे संकेत दिलेत. बसपाची राजस्थानात होणाऱ्या २०२३ मधील विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु आहे. यादरम्यान, बसपाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांनी सोमावारी एक बैठक घेतली. यामध्ये त्यांनी राजस्थानात संघटन मजबूत करण्यासाठीचा अजेंडा मांडला.
राजस्थानातील बसपाची रणनीती काय असेल हे त्यांनी या बैठकीत विशद केलं. त्यानुसार, त्यांनी, राज्याला दोन झोनमध्ये विभाजीत करण्याचा निर्णय घेतला असून एकामध्ये १६ जिल्हे तर दुसऱ्या झोनमध्ये १७ जिल्ह्यांचा समावेश असेल. आकाश आनंद यांनी ट्विट करत राजस्थनातील विधानसभा आमच्या समाजासाठी मान-सन्मान आणि स्वाभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, भाजपनं देखील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोणतीही निगेटिव्ह गोष्ट होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे. कारण राजस्थानचा गेल्या तीस वर्षातला इतिहास आहे की, इथं सलग दुसऱ्यांदा कोणताही पक्षाला सत्तेत आलेला नाही. यंदा काँग्रेसला सत्ता कायम ठेवण्याची संधी मिळू नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.