Mayawati : वाढदिनीच मायावतींची मोठी घोषणा; निवडणुकीत विरोधकांना बसणार मोठा फटका!

बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांनी आज वाढदिनी मोठी घोषणा केलीये.
Happy Birthday Mayawati
Happy Birthday Mayawatiesakal
Updated on
Summary

आमचा पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाशीही युती करणार नाही.

बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांनी आज वाढदिनी मोठी घोषणा केलीये. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या अटकळांना त्यांनी पूर्णविराम दिलाय.

मायावतींनी वाढदिनी स्पष्ट केलं की, आमचा पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आणि कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाशीही युती करणार नाही. जेव्हा-जेव्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका झाल्या, तेव्हा बसपाचा जनाधार वाढला आणि मतदानाची टक्केवारीही उंचावली. मात्र, आता ईव्हीएमद्वारे निवडणुका होत असल्यामुळं फरक पडला आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. भाजपचा विजय हा ईव्हीएमचा चमत्कार असल्याचंही त्या म्हणाल्या.

Happy Birthday Mayawati
ISRO Report : समुद्राच्या काठावर वसलेली शहरं बुडण्याची शक्यता; ISRO नं जारी केला नवा अहवाल

आज (रविवार) पक्ष कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना बसपा सुप्रिमो म्हणाल्या, काही पक्ष बसपासोबत युती करण्याचा भ्रम पसरवत आहेत, त्यामुळं आम्ही युती न करता निवडणूक लढवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Happy Birthday Mayawati
Mayawati : UP सारख्या राज्यात 'दलित मुख्यमंत्री' होणं सोप नव्हतं, पण ते 'बहेनजी'नं करुन दाखवलं!

ईव्हीएमवरून मतदान करण्याबाबत मायावती म्हणाल्या, याबाबत आशंका व्यक्त केली जात आहे. जिथं ईव्हीएमनं मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, तिथं गडबड होऊन ती थांबवण्यात आली. पण, आपल्या देशात अजूनही ईव्हीएमनंच निवडणुका होत आहेत. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होईपर्यंत आपल्या पक्षाच्या जागा वाढल्या, पण ईव्हीएमद्वारे निवडणुका झाल्यानंतर त्याचा परिणाम झाला. आमच्या पक्षाला पुढं जाण्यापासून रोखलं जात आहे. आमचा पक्ष हा गरीब, दलित, मागासवर्गीयांचा पक्ष आहे. भाजप सरकारमध्ये शेतकरी, मजुरांवर अन्याय होत आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

Happy Birthday Mayawati
Indigo Airlines : आकाशात उडणाऱ्या विमानात प्रवाशाला रक्ताच्या उलट्या; इमर्जन्सी लँडिंगनंतर 'त्याचा' मृत्यू

मायावतींनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या शुभचिंतकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी दलित, गरीब, शोषित, मागासलेले, उपेक्षित आणि अल्पसंख्याकांनी बसपासोबत हातमिळवणी करून केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेची चावी आपल्या हातात द्यावी, असं आवाहनही मायावतींनी केलं. आरक्षणावरून मायावतींनी काँग्रेस, भाजप आणि सपावर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()