लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी (ता.२७) झालेल्या बैठकीनंतर विभाग प्रभारी व भाईचारा समित्या बर्खास्त केल्या आहेत. आता प्रत्येक तीन मंडळांवर एक झोन राहिल. नवीन रचनेत प्रदेशाचे तीन नवीन प्रभारी बनवले गेले आहेत. ती जबाबदारी मुनकाद अली, राजकुमार गौतम आणि डाॅ.विजय प्रताप यांना देण्यात आली आहे. प्रदेश प्रभारी मायावती यांनी थेट रिपोर्ट देतील. बसपा प्रमुख मायावती (Mayawati) यांनी रविवारी पक्ष कार्यालयात राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची चिकित्सा करण्यात आली. (Mayawati Dissolved BSP Committees In Uttar Pradesh)
बैठकीत प्रदेशाचे सर्व ४०३ विधानसभा जागांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसह विभाग प्रभारी, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्षांसह भाईचारा समितीच्या सदस्यांना बोलावण्यात आले होते. मायावती यांनी बैठकीत चर्चा केल्यानंतर विभाग प्रभारी आणि भाईचारा समित्या तात्काळ बर्खास्त केल्या आहेत. शहा आलम उर्फ गुड्डू जमाली यांनी आज बसपात घरवापसी केली आहे. मायावती यांनी याबाबत माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांना दिली. आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गुड्डू जमाली आझमगडमधून निवडणूक लढणार आहेत. या पूर्वी मायावतीने भाजपच्या विजयावर म्हटले होते, की यंदाच्या निवडणूक निकाल पुढच्या वाटचालीसाठी एक धडा आहे.
आपल्याला निवडणुकीतील पराभवाने घाबरायचे नाही. प्रत्येक वेळेप्रमाणे यंदा ही बसपाविषयी चुकीचा प्रचार झाला होता. समाजवादी पक्षाने आम्हाला तर भाजपची बी टीम म्हटले होते, असे मायावती म्हणाल्या. जर मुस्लिम-दलित मतदान मिळाले असते तर भाजपला (BJP) आम्ही पराभूत केले असते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपा उमेदवार हरल्याने पक्षाचे नेते तथा कार्यकर्त्यांनी न घाबरता आणि निराश होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. पराभवाची कारणे समजून आणि त्यातून धडा घेऊन आपल्या पक्षाला पुढे न्यायचे आहे. पुढे आपल्याला सत्तेत यायचे आहे. त्या म्हणाल्या हा निवडणूक निकाल आपल्यासाठी धडा आहे. यावेळेस ही बसपाविषयी (Bahujan Samaj Party) चुकीचा प्रचार झालेला आहे. याबाबत सर्वांना सजग राहावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.