उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रतापगडमधील कुंडा (Kunda)येथून सिंधुजा मिश्रा यांना तिकीट दिले आहे. या जागेवरून राजा भैय्याही रिंगणात आहेत. प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा मतदारसंघावर राजा भैय्या यांचे वर्चस्व आहे. राजा भैय्यांच्या प्रभावामुळे येथे एकाही उमेदवाराला आजपर्तय विजय मिळवता आला नाही. खरंतर उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या की हमखास नाव समोर येते ते म्हणजे बाहुबलीचे. हा बाहुबली दुसरा कोण नसून प्रतापगड कुंडा येथील आमदार रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया (Raja Bhaiya) आहेत. उत्तर प्रदेशात बाहुबली आणि मायावती (Mayawati) सरकार असं एक समीकरणच आहे. राजा भय्या यांनी एका मुलाखतीत त्यांना बाहुबली असे का संबोधतात याचा खुलासा केला आहे. नेमके कोण आहेत हे बाहुबली (राजा भैया) जाणून घेऊया.
राजा भय्या यांना बाहुबली का म्हणतात
राजा भैय्या हे अवध प्रदेशातील भद्री संस्थानाचे वारस आहेत. राजकारणात ते खूप सक्रिय आहेत. १९९३ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पहिली निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते २०१७ पर्यंत झालेल्या सर्व ६ निवडणुकांमध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले. मायावतींच्या कार्यकाळात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले ते राजा भैय्या यांच्यावर आणि यातून अनेक खटल्यांतून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. द लॅलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांना बाहुबली का म्हणतात याविषयी त्यांनी सविस्तर सांगितले आहे. मायावतींच्या कार्यकाळाचा संदर्भ देत ते म्हणाले, कुंडामध्ये जेवढे खटले दाखल केले गेले त्या प्रत्येक खटल्यांतून माझी निर्दोष सुटका झाली. माझ्यावर दाखल झालेल्या केसेस पाहून मला लोक बाहुबली म्हणू लागले आणि त्यावेळी पासून माझ नावच बाहुबली झाले.
राजा भैय्या यांनी ३० नोव्हेंबर २०१८ रोजी जनसत्ता दल लोकतांत्रिक नावाने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. या निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. राजा भैय्या यांनी १९९३ मध्ये कुंडा विधानसभेतून पहिली निवडणूक लढवली. तेव्हापासून ते २०१७ पर्यंत झालेल्या सर्व ६ निवडणुकांमध्ये ते अपक्ष निवडून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.