MCD Result : पराभवानंतरही भाजपचं 'आप'च्या पुढे; कारण...

amit shah- narendra modi, arvind kejriwal
amit shah- narendra modi, arvind kejriwal
Updated on

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला (भाजप) दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून (आप) पराभव पत्करावा लागला असला, तरी दिल्लीच्या राजकारणात भाजपने आपली ताकद कायम राखण्यात यश मिळवलं आहे. मागील एमसीडी निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा मतांचा टक्का यंदा वाढला आहे. (MCD Result news in Marathi)

2017 मध्ये भाजपला एकूण वैध मतांच्या जवळपास 37 टक्के मतं मिळाले होते. 2017 मध्ये, एमसीडीचे पूर्व, दक्षिण आणि उत्तर कॉर्पोरेशन भागात विभागली गेली होती. या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी ३७ वरून ३९ वर गेली आहे. अर्थात भाजपच्या मतांच्या टक्केवारीत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सत्तेत असताना १५ वर्षानंतरही मतांचा टक्का वाढविणे भाजपची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Supreme Court : नैतिकता किती खालावली? काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर SC चे खडे बोल

दरम्यान 'आप'चा विजय भाजपला धक्का देणार नसून काँग्रेस, बसप आणि अपक्षांकडे गेलेली भाजपविरोधी मते एकत्रित करून मिळवलेला विजय आहे. भाजपनेही सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरवत, 100 चा आकडा पार केला. एमसीडीमध्ये भाजप १०० च्या पुढे जाईल असा अंदाज कोणत्याही एक्झिट पोलने वर्तविला नव्हता.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

मजबूत संघटना

दिल्लीत भाजपचे अतिशय मजबूत संघटन आहे. या निवडणुकीत त्यांच्या मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ हे सिद्ध करते. तर मतदारांना विधानसभा निवडणुकीप्रमाणे मतदान करण्यास उत्साह न दाखवल्याने आपला टक्केवारीत धक्का बसल्याचं दिसून येत. या व्यतिरिक्त दिल्लीत मदनलाल खुराणा, बलराज मधोक आणि नंतर साहिबसिंग वर्मा यांच्यासारख्या दिग्गजांनी भाजपला रुजवलं आहे. त्याचा फायदा भाजपला झाला आहे.

भाजपकडे एक निष्ठावान मतदार आहे. भाजपने दिलेले आश्वासने पूर्ण केली किंवा नाही केली तरी हे मतदार कायम भाजपला मतदान करतात. या मतांची भाजपकडे मोठी मतपेढी आहे. गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीतील कोणत्याही निवडणुकीत भाजप ३२ टक्क्यांपेक्षा कमी मतांच्या खाली गेलेला नाही.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
PUNE: राज्यपालांविरोधात वातावरण तापलं; आता पुण्यातही बंदची हाक

विशिष्ट गटांच्या मतदात्यांचा भाजपलाच पाठिंबा

दिल्लीत भाजपची खरी व्होट बँक बनिया मतदार आहेत, जे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले दिसतात. लहान दुकानदार आणि ६० वर्षांवरील लोकांमध्येही भाजपची आघाडी होती. उच्चवर्णीय आणि तुलनेने सधन मतदारांचे प्राबल्य असलेल्या पूर्व दिल्लीत भाजपने उत्तम कामगिरी केली आहे. यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा परिसर पटपरगंजचाही समावेश होता.

विचारधारा आणि ध्रुवीकरणाचे राजकारण

भाजपने निवडणुकीच्या काळातही वैचारिक मुद्दे मांडण्याचे धोरण सातत्याने राबविले आहे. 2017 च्या एमसीडी निवडणुकीत, भाजपने सर्जिकल स्ट्राईकला निवडणुकीचा मुद्दा बनविला होता. यावेळी पक्षाने श्रद्धा वालकर हत्येचा मुद्दा पुढे केला होता.

amit shah- narendra modi, arvind kejriwal
Supriya Sule : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्या संसदेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

मोदी फॅक्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत मोठी लोकप्रियता आहे. मुख्यत: पंतप्रधान मोदींवरील विश्वासामुळे बऱ्याच मतदारांनी भाजप नगरसेवकाविरूद्धच्या नाराजीकडे दुर्लक्ष केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.