Baby Ariha : जर्मनीत अडकलेली बेबी अरिहा लवकरच भारतात परतेल! परराष्ट्र मंत्रालयाचं आश्वासन

कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना याबाबत लक्ष घालण्यासंबंधी पत्र लिहून विनंती केली होती.
Baby Ariha Shah
Baby Ariha Shah
Updated on

नवी दिल्ली : गेल्या २१ महिन्यांपासून जर्मनीच्या बर्लिनमधील फोस्टर केअर फॅसिलिटीमध्ये अडकून पडलेल्या बेबी अरिहा शहा हिला लवकरच भारतात आणण्यात येईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलं आहे. कालच यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. (MEA assures to bring baby Ariha back to India soon)

Baby Ariha Shah
Wrestler Protest: राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा...

फोस्टर केअर फॅसिलिटी हे जर्मनीतील चाईल्ड सर्व्हिसेस असून त्यांनी बेबी अरिहाला दोन वर्षांपूर्वी आपल्या सोबत ठेवलं होतं. कारण तिला तिच्या पालकांकडून मारहाण झाल्याचा त्यांना संशय होता. पण तिच्या पालकांवरील गुन्हे फेब्रुवारी २०२२ मध्ये रद्द करण्यात आले. पण बेबी अरिहाला तिच्या पालकांसोबत पाठवण्यास जर्मनीनं नकार दिला होता. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

Baby Ariha Shah
Coromandel Express Accident : ओडिशात भीषण अपघात! मालगाडीला एक्स्प्रेसची धडक, अनेकजण अडकले

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत सांगितलं की, मंत्रालयाकडून स्वतःहून बेबी अरिहाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या बाळाच्या बाजूनं सर्वप्रकारे मदत केली जाणार आहे.

बेबी अरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यात यावं यासाठी जर्मनच्या संबंधित विभागाकडं विनंती करण्यात आली आहे. कारण ती भारताची नागरिक आहे आणि आपल्या मायदेशात परतण्याचा तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()