अफगाण घडामोडी: पंतप्रधानांची परराष्ट्र मंत्रालयाला महत्त्वाची सूचना

पंतप्रधानांनी काय सूचना केली आहे?
S Jaishankar
S Jaishankar
Updated on

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर (afganistan) पुन्हा एकदा तालिबानने (taliban) नियंत्रण मिळवल्यापासून तिथे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो नागरिकांना विविध देशांच्या एअर फोर्सच्या विशेष विमानाने (air force plane) सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. काबुल विमानतळावर (airport) गर्दी आहे. परदेशी आणि तिथल्या मूळ नागरिकांना काहीही करुन अफगाणिस्तान सोडायचे आहे. त्यासाठी प्रत्येकजण तिथून निघणाऱ्या विमानांमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचेही मिशन एअर लिफ्ट सुरु आहे. मागच्या आठड्यापासून भारताने वायू दलाच्या C-17 ग्लोबमास्टर या विशेष विमानाने आतापर्यंत शेकडो नागरिकांना सुरक्षितरित्या भारतात आणले आहे. आजही विशेष विमानाने अफगाणिस्तानातून आणखी नागरिक भारतात दाखल होतील.

S Jaishankar
पॉप स्टार आर्यना सईदने सांगितलं अफगाणिस्तानचं धक्कादायक वास्तव

अफगाणिस्तानात सुरु असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र मंत्रालयाला महत्त्वाची सूचना केली आहे. अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या या परिस्थितीत, भारत नेमका कशा प्रकारे काम करतोय या बद्दल संसदेतील अन्य पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्याची सूचना पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र मंत्रालयाला केली आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या बद्दल सविस्तर माहिती देतील, असे त्यांनी सांगितले.

S Jaishankar
Dahi handi 2021: सलग दुसऱ्यावर्षी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाही

शेकडो तालिबानी फायटर्स निघाले पंजशीरकडे

पंजशीर खोऱ्यामुळे (panjshir valley) तालिबानला (Taliban) अजूनही संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीय. याआधी १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात (afganistan) तालिबानची राजवट होती. पण त्यावेळी सुद्धा पंजशीर स्वतंत्र होते. रशियन फौजांना (Russian army) सुद्धा इथे विजय मिळवता आला नव्हता. सैन्याकडून प्रतिकार न झाल्यामुळे तालिबानने अत्यंत सहजतेने अफगाणिस्तानातील एक-एक प्रांत ताब्यात घेतले. पण पंजशीरमध्ये मात्र त्यांना आव्हान मिळू शकते.

कारण पंजशीर सुरुवातीपासून तालिबान विरोधाचे केंद्र राहिले आहे. आता पंजशीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेकडो फायटर्स पंजशीरच्या दिशेने रवाना झाले आहेत, अशी माहिती तालिबानने दिली आहे. तालिबान विरोधात लढण्याची तयारी असलेले अफगाण सैनिक पंजशीरमध्ये दाखल होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.