सौदी अरेबियाच्या ग्रँड मक्का मशिदीचे माजी इमाम शेख अदेल अल-कलबानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जीन्स पॅंट आणि टी-शर्टमध्ये कलबानी हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलवर बसले आहेत. आधुनिक कपडे परिधान करून मोटारसायकल चालवण्याबाबत अरब जगतातून या व्हिडीओवरती विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सौदी अरेबियातील ग्रँड मक्का मशिदीचे माजी इमाम शेख अदेल अल-कलबानी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आधुनिक कपडे परिधान करून हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल चालवणारा कलबानीचा नवा अवतार पाहून अरब जगतात खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ स्नॅपचॅटवर एका व्यक्तीने रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये कलबानी यांनी पांढरा टी-शर्ट आणि हाफ जॅकेट घातले आहे आणि ते हार्ले डेव्हिडसन बाइकवर बसलेले दिसतात. जॅकेटवर अमेरिकन ध्वजासह अनेक आयकॉन प्रिंट्स आहेत.
या व्हिडिओमध्ये ते मोटारसायकलवर बसून व्हिक्ट्री(Victory)चे चिन्ह दाखवत हसत आहेत.
सोमवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून मक्का मशिदीचे माजी इमाम ट्विटरवर ट्रेंड करत आहेत, परंतु संपूर्ण अरब जगातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. इमामच्या पेहरावावर अनेक जण आक्षेप घेत आहेत.
मात्र, अनेक लोक इमाम यांचे समर्थनही करत आहेत. या व्हिडीओबाबत एका ट्विटर युजरने लिहिले की, "मला वाटते की शेख यांनी असे काहीही केले नाही जे करण्यास मनाई आहे. त्यांना जे करायचे आहे ते करण्यास ते स्वतंत्र आहेत." इमामांना विशिष्ट प्रकारच्या पोशाखात पाहण्याची आपल्याला खरोखर सवय आहे. याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे पाहणे आम्ही स्वीकारू शकत नाही. हे चुकीचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.