Delhi Canada Flight: करत होता गंमत पण आलं अंगलट! विमान उडवण्याची दिली धमकी अन् 12 तास...;13 वर्षाच्या मुलाचा प्रताप आला समोर

Delhi Canada Flight: गेल्या आठवड्यात दिल्ली-कॅनडा विमान उडवण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय मुलाला पकडले आहे. मुलाने गमतीने हा मेल पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.
Delhi Canada Flight
Delhi Canada FlightEsakal
Updated on

गेल्या आठवड्यात दिल्ली-कॅनडा विमान उडवण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय मुलाला पकडले आहे. मुलाने गमतीने हा मेल पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा मेल पाठवल्यानंतर पोलिसांना त्याचा शोध घेता येईल का हे त्याला पाहायचे होते. आता त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

एका 13 वर्षांच्या मुलाने दिल्लीहून कॅनडाला जाणारे विमान उडवून देण्याची धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. 4 जून रोजी रात्री 11:30 वाजता दिल्ली-टोरंटो फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिल्ली पोलिसांना ईमेलद्वारे मिळाली. यानंतर सर्व एजन्सी तात्काळ कामाला लागल्या आणि विमान 12 तासांपेक्षा जास्त काळ थांबवावे लागले.

आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान विमानतळ पोलिसांनी एका 13 वर्षाच्या मुलाला पकडले आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळाले की, ज्या ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती तो एक तासापूर्वीच तयार करण्यात आला होता. हा मेल उत्तर प्रदेशातील मेरठ येथून पाठवण्यात आला होता. पोलिसांनी मेरठला जाऊन तपास सुरू केला तेव्हा हे मेल एका 13 वर्षाच्या मुलाने पाठवल्याचे समोर आले आहे.

Delhi Canada Flight
Pakistan PM : मोदीवर प्रेम नाही तर नाईलाज...; शाहबाज शरीफ यांच्या शुभेच्छांच्या मेसेजवर पाकच्या संरक्षण मंत्र्याचं स्पष्टीकरण

गंमत म्हणून पाठवलेला मेल

मुलाने सांगितले की, मुंबईतील फ्लाइटमध्ये मीडियामध्ये बॉम्ब कॉल पाहिल्यानंतर त्याला ईमेल करण्याची कल्पना आली. पोलीस त्याचा मेल ट्रेस करू शकतील की नाही हे त्याला जाणून घ्यायचे होते. केवळ गंमत म्हणून त्याने ही धमकी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आपल्या फोनवर बनावट ईमेल आयडी तयार केला आणि त्याच्या आईच्या फोनवरून इंटरनेटचा वापर करून हा मेल पाठवला.

Delhi Canada Flight
Indor Woman Murder : भयंकर! आधी महिलेची निर्घृण हत्या; हात-पाय ऋषिकेशला तर...इंदूरमध्ये सापडले शरीराचे तुकडे, दोन राज्यात खळबळ

टीव्हीवर विमानतळावर बॉम्बची बातमी पाहून मुलगा घाबरला

मेल पाठवल्यानंतर त्याने हा मेल डिलीटही केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने टीव्हीवर पाहिले की, दिल्ली विमानतळावर बॉम्ब असल्याची बातमी आहे. हे पाहून तो घाबरला. भीतीपोटी त्याने हा प्रकार घरच्यांना सांगितला नाही. पोलिसांनी मुलाचा फोन जप्त केला असून त्याचे समुपदेशन सुरू आहे. मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.

Delhi Canada Flight
D Purandeshwari: लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या डी पुरंदेश्वरी कोण? चंद्राबाबूंना गप्प करण्यासाठी भाजपची खेळी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.