Narendra Modi : भाजपशासित मुख्यमंत्र्यांची आजपासून बैठक;पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सरकारचा ‘रोडमॅप’ निश्चित होणार

भाजपशासित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक उद्यापासून (शनिवार) दिल्लीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या बैठकीला महत्त्वाचे मानले जात आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

नवी दिल्ली : भाजपशासित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दोन दिवसीय बैठक उद्यापासून (शनिवार) दिल्लीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या या बैठकीला महत्त्वाचे मानले जात आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक राज्यांमध्ये चांगले यश मिळाले नाही. उत्तरप्रदेशसारख्या राज्यात भाजपला जोरदार धक्का बसल्याने या अपयशाचे कारणे समजून घेण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे. याशिवाय येत्या तीन महिन्यात महाराष्ट्र, हरियाना, झारखंड याराज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने या राज्याची स्थितीचा आढावाही भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत घेतला जाणार आहे.

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी भाजपशासित राज्यांमध्ये कशाप्रकारे प्रभावीपणे करण्यात येईल, यावर या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांचे आहे. या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी राज्यात उपाययोजना राबविणे तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ राज्यातील लोकांना कसा होईल, याचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे. विरोधकांच्या संविधान बचाव व दलित विरोधी आरोपांना उत्तर देण्याचा प्रभावी प्रयत्न करण्याच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्व राज्यांना मिळालेल्या निधीचा प्रसार व प्रचार प्रभावी करण्याचे निर्देश दिले जाणार आहे.

महाराष्ट्र व हरियाना महत्त्वाचे

येत्या तीन महिन्यात महाराष्ट्र व हरियाना या दोन्ही भाजपशासित राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात महायुती व हरियानामध्ये स्वबळावर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. या दोन्ही राज्यांमधील स्थितीची माहिती यावेळी घेतली जाणार आहे.

दिल्ली येथे होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com