Frog : मेघालयात बेडकाची नवीन प्रजाती सापडली

मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना यश आले आहे.
Frog
FrogSakal
Updated on
Summary

मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना यश आले आहे.

शिलाँग - मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘ॲनिमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकातही प्रसिद्ध झाले आहे. देशात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी, २०१४ मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुन्का’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते.

संशोधक भास्कर साईकिया यांनी सांगितले की, झेड्‌एसआयचे मेघालयमधील कार्यालय तसेच संस्थेच्या पुण्यातील संशोधकांनी मेघालयमधील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यातील सिजू गुंफा प्रणालीमध्ये कॅस्केड रॅनिड बेडकांची नवीन प्रजाती शोधली आहे. संशोधकांच्या पथकात ‘झेडएसआय’च्या मेघालयातील साईकिया आणि डॉ. विक्रमजीत सिन्हा तर पुण्यातील डॉ. के.पी.दिनेश आणि शाभम अन्सारींचा समावेश होता. सिजू गुहा ही चार किमी लांबीची नैसर्गिक चुनखडीची गुहा आहे आणि कोरोना लॉकडाउनपूर्वी जानेवारी २०२० मध्ये सुमारे ६० ते १०० मीटर खोलवर हा बेडूक सापडला होता, असे ते म्हणाले.

या नवीन बेडकाला तो सापडलेल्या गुहेवरून ‘अमोलोप्स सिजू’ हे नाव देण्यात आले आहे. बेडूक मूलत: गूढ स्वरूपाचा असल्याने अमोलोप्स प्रजातीच्या इतर बेडकांच्या इतर ज्ञात प्रजातींमधून त्यांची विशिष्ट ओळख पटविण्यासाठी या बेडकांच्या नमुन्यांचा रेण्वीय अभ्यास केला. आकारविज्ञान, रेण्वीय आणि स्थानिक डेटाच्या आधारे संशोधकांच्या पथकाने सिजू गुहांमध्ये या बेडकांचे अस्तित्व आढळल्यावर शिक्कामोर्तब केले. सिजू गुहांच्या प्रवेशद्वारापासूनच्या प्रकाशातील ६० ते १०० मीटर आणि प्रवेशद्वारापासून १०० मीटरपेक्षा दूरच्या अंधाऱ्या भागात संशोधकांना हा बेडूक आढळला. संशोधकांना त्यांच्यात कोणत्याही स्वरूपाचे बदल आढळले नाहीत. त्यातून ही प्रजाती गुहेची कायमस्वरूपी रहिवासी नसल्याचे सूचित होत असल्याचेही संशोधकांचे मत आहे.

१९२२ मध्येच पहिले संशोधन

‘झेडएसआय’च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सिजू गुहेत १९२२ मध्ये पहिले जैव संशोधन केल्यापासूनच गुहेच्या प्रवेशद्वारापासून ४०० मीटर अंतरापर्यंत बेडकांचे अस्तित्व असल्याचे अहवाल होते. सिंजू गुंफा प्रणालीत प्राण्यांच्या १०० हून अधिक प्रजाती आहेत. ज्यात मुख्यत्वे कोळी, गांडूळ आदींचा समावेश आहे. देशातील प्राण्यांचे सर्वेक्षण व यादी तयार करण्यासह सिजू गुहेतील प्राण्यांचे दस्तावेजीकरण करणे हा झेडएसआयच्या संशोधन प्रकल्पाचा भाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.