Politics : शपथविधीला तीन दिवस शिल्लक असतानाच भावी मुख्यमंत्र्यांना मोठा दणका; 'या' आमदारांनी काढून घेतला पाठिंबा!

संगमांच्या समर्थनार्थ असलेल्या दोन आमदारांनी पाठिंबा काढून घेतलाय.
Meghalaya Assembly Election
Meghalaya Assembly Electionesakal
Updated on
Summary

शुक्रवारी संध्याकाळपर्यंतच HSPDP नं संगमा यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि आपल्या आमदारांना NPP-नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ नये, असं पत्र जारी केलं.

मेघालय विधानसभा निवडणुकीनंतर (Meghalaya Assembly Election) सरकार स्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री कॉनराड संगमा (Conrad Sangma) यांनी इतर प्रादेशिक पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली.

मात्र, संगमांच्या समर्थनार्थ असलेल्या दोन आमदारांनी पाठिंबा काढून घेतलाय. राज्यपालांसोबतच्या बैठकीत संगमा यांनी 32 आमदारांच्या सह्यांचं समर्थन पत्र सुपूर्द केलंय.

60 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 31 आहे. परंतु, संगमा यांना सरकार स्थापन करण्यासाठी अतिरिक्त आमदार मिळवण्यात यश आलंय. शपथविधी सोहळ्यासाठी 7 मार्च ही तारीखही निश्चित करण्यात आलीये. समर्थन पत्रावर एनपीपीच्या 26, भाजपच्या दोन, हिल्स स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा (Hills State Peoples Democratic Party) एक आणि दोन अपक्ष आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आमच्याकडं पूर्ण बहुमत आहे. भाजपनं (BJP) आधीच पाठिंबा दिलाय. अन्य काही आमदारांनीही पाठिंबा दिला आहे, असं संगमा यांनी सांगितलं होतं.

Meghalaya Assembly Election
Sanjay Raut : शिवसेना तुमच्या बापाची आहे का? अर्वाच्य शब्दांत राऊतांची निवडणूक आयोगावर टीका

विशेष म्हणजे, शुक्रवारी संध्याकाळपर्यंतच HSPDP नं संगमा यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि आपल्या आमदारांना NPP-नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ नये, असं पत्र जारी केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एचएसपीडीपीचे अध्यक्ष केपी पांगनियांग यांनी कॉनराड संगमा यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाचे दोन आमदार मेथोडियस डखार आणि शकलियार वार्जरी हे त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असं म्हटलंय. एचएसपीडीपीला या प्रकरणात स्वारस्य नाही आणि म्हणून आम्ही आमचा पाठिंबा काढून घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, एनपीपी आणि एचएसपीडीपी यांच्यातील या पत्रांच्या देवाणघेवाणीवर कोणतंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही.

Meghalaya Assembly Election
तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.