Mehbooba Mufti: सर्वोच्च न्यायालय भगवान कृष्णाप्रमाणे जम्मू-काश्मीरला वाचवण्यासाठी येईल; मेहबूबा मुफ्ती यांचे विधान

Mehbooba Mufti
Mehbooba Mufti
Updated on

Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. स्वातंत्र्यानंतर आज देशाची स्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. भाजप लोकांमध्ये हिंदू-मुस्लीम अशी फूट पाडत आहे. देशात शांतता नांदायची असेल तर वैयक्तिक मतभेद विसरून जावे लागेल. तसेच राहुल गांधी एका राष्ट्राचा विचार मरू देणार नाहीत, असे  मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

कलम 370 संदर्भात महाभारताचे उदाहरण देत मेहबूबा म्हणाल्या, "कौरवांशी झालेल्या लढाईत ज्या प्रकारे भगवान कृष्ण प्रकट झाले, मला आशा आहे की सर्वोच्च न्यायालय जम्मू-काश्मीरला वाचवण्यासाठी भगवान कृष्णाप्रमाणे येईल, परंतु ही एक राजकीय लढाई आहे त्यात कृष्ण भगवान नाहीत."

"आज भारताच्या कल्पनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, जर तुम्हाला या देशाचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमचे वैयक्तिक हित विसरून पुढे यावे लागेल, जसे आम्ही (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आले आहेत. आम्ही वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात आहोत. मी एक पाऊल टाकले, फारुख साहेबांनी एक पाऊल टाकले. जम्मू-काश्मीरसाठी आपण एकत्र आलो आहोत", असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

आगामी 2024 निवडणुकीबाबत विरोधकांच्या आघाडीच समन्वय नाही, यावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "युतीमध्ये अडचणी आहेत. मात्र अशा अनेक अडचणी येतील. मात्र त्यावर आम्ही मात करु. राहुल गांधी हे पीएम मटेरियल आहेत."

Mehbooba Mufti
Chandrashekhar Bawankule: पक्ष उभारणीसाठी 18-18 तास काम करावं लागतं; बावनकुळे यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "देशात गांधी, नेहरू, सरदार पटेल विरुद्ध गोडसे अशी लढाई सुरु आहे. नूह आणि मणिपूरमध्ये काय चालले आहे. पाकिस्तानात असे घडत आहे, सीरियात असे घडत आहे, लोक अल्ला हू अकबर म्हणत आहेत आणि एकमेकांना मारत आहेत. इथं लोक जय श्री राम म्हणत आहेत आणि लोकांना मारत आहेत." (latest marathi news)

मला खूप आनंद आहे की राहुल गांधी भारताला पुढे घेऊन जात आहेत. ते खूप शिकलेले आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे, ते सर्व विषयांवर बोलू शकतात.राहुल यांना भारत वाचवायचा आहे. त्यांना सतावणारी गोष्ट म्हणजे भारतात विचार कसा वाचवायचा, असे मेहबूबा म्हणाल्या. 

Mehbooba Mufti
MLA Prajakt Tanpure : 'शासन आपल्या दारी'मुळे ST बस रद्द! पवार गटाच्या आमदाराने विद्यार्थ्यांना पोहचवले शाळेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.