Article 370 : कलम 370 रद्द केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते नजरकैदेत, PDPचे कार्यालयही...

Mehaboba Mufti Jammu Kashmir: काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
Mehaboba Mufti Arrested Jammu Kashmir
Mehaboba Mufti Arrested Jammu KashmirSakal
Updated on

Mehaboba Mufti: कलम 370 रद्द केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

पीडीपीने (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या वर्धापनदिनाच्या निषेधार्थ शांततापूर्ण कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. कार्यक्रमाला परवानगी न देण्याबरोबरच पीडीपी नेत्यांवर जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

मेहबुबा मुफ्तींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. चार वर्षांपूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून त्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले होते.

Mehaboba Mufti Arrested Jammu Kashmir
Maharashtra Blog Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 370 च्या वर्धापन दिनानिमित्त पीडीपी नेते संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करण्याचा विचार करत असल्याच्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले की, मला आणि इतर वरिष्ठ पीडीपी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, मध्यरात्री अचानक पोलिसांनी पीडीपी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठेवले.

Mehaboba Mufti Arrested Jammu Kashmir
Independence Day 2023 : ईशान्य भारतातील या '5' महिलांचे योगदान इतिहासात विशेष महत्वपूर्ण

त्या म्हणाल्या की, पोलिसांचे हे वर्तन सर्वोच्च न्यायालयातील सरकारच्या दाव्याचे खंडन करते ज्यात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल असे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागताना माजी मुख्यमंत्री म्हणाल्या की, एकीकडे संपूर्ण काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याचा आनंद सरकार साजरा करत असताना, दुसरीकडे काश्मीरमधील लोकांच्या भावना चिरडल्या जात आहेत.

मला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय सुनावणीदरम्यान याची दखल घेईल. विशेष म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयात कलम 370 च्या मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.