भारताचे प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रतन टाटा यांनी त्यांची बरीचशी संपत्ती ही दानधर्म आणि कुटुंबियांना दिली आहे. पण त्यांच्याजवळच्या काही सर्वात मौल्यवान वस्तूंबाबात मात्र रतन टाटा यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यांच्या मृत्यूपत्रात विशेष तरतूद केलेल्या या वस्तूंमध्ये पिस्तूल, एक शॉटगन आणि एक रायफल यांचा समावेश आहे.