नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,५०० कोटींचा घोटाळा करुन भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने पुन्हा एकदा डॉमिनिकाच्या हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. डॉमिनिकामध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी चोक्सीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोनदा चोक्सीला याप्रकरणी दिलासा द्यायला कोर्टानं नकार दिला होता. दरम्यान, चोक्सीच्या नव्या जामीन अर्जावर ६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. (Mehul Choksi applies for bail again in Dominica High Court Hearing on July 6)
जून महिन्याच्या सुरुवातीला चोक्सीचा जामीन अर्ज डॉमिनिकाच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून फेटाळण्यात आला होता. त्यानंतर चोक्सीनं हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानंही त्याला जमीन नाकारला होता. हा जामीन नाकारताना हायकोर्टानं 'फ्लाइट रिस्क'चं कारण दिलं होतं.
दरम्यान, चोक्सी भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून अँटिग्वा या देशात आहे. चोक्सी इथे गेल्यानंतर पीएनबी घोटाळा उघड झाला होता. अँटिग्वाचं त्याच्याकडे नागरिकत्व असून त्यानं भारताचं नागरिकत्व सोडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, चोक्सी २३ मे २०२१ रोजी अचानक गायब झाला होता. त्यानंतर तो शेजारच्या डॉमिनिका या देशात आपल्या मैत्रिणीसोबत आढळून आला होता. या देशात तो बेकायदेशीर मार्गानं दाखल झाला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना चोक्सीनं म्हटलं होतं की, "आपलं अपहरण करुन या कॅरेबिअन बेटांवरील देशात आणलं गेलं आहे."
डॉमिनिकाच्या पंतप्रधानांनी नाकारला होता दावा
दरम्यान, डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट यांनी नुकताच दावा फेटाळला होता की, त्यांच्या सरकारचा चोक्सीच्या अपहरणामध्ये हात होता. भारताच्या मदतीनं डॉमिनिका सरकारनं चोक्सीचं अपहरण केलं होतं असा आरोप स्केरिट सरकारवर करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.