डॉक्टर लस द्यायची तर... झाडावर या

झाडावर चढल्यानंतर या व्यक्तीने झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्यास सुरुवात केली.
Vaccination
Vaccination Google
Updated on

पुदुच्चेरी : कोरोना महामारीपासून (Corona Vaccination) बचाव करण्यासाठी लसीकरण हेच एकमेव शस्त्र आहे. मात्र, आजही अनके जण ही लस घेण्यासाठी काही ना काही कारणं देऊन लस घेणं टाळत आहेत. दरम्यान, नागरिकांच्या अधिकाधिक लसीकरणासाठी (Vaccination Drive) सरकारकडूनदेखील अनेक पर्याय अवलंबले जात असून अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी (Health Workers) घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण करत आहेत. मात्र, कोरोनाची लस घेणं टाळण्यासाठी एक व्यक्ती चक्क झाडावर चढून बसल्याचा प्रकार समोर आला आहे. पुदुच्चेरीच्या एका गावामध्ये ही घटना घडली असून मुथुवेल असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. (Puducherry Men Climbed on Tree To Avoid Covid-19 vaccine jab)

Vaccination
Precautionary डोसची आठवण करुन देणारा येणार SMS: आरोग्य मंत्रालय

याबाबतची माहिती अशी की, पुदुच्चेरीच्या (Puducherry) एका गावामध्ये कोरोनाची लस देण्यासाठी आरोग्य अधिकारी (Health Workers) गावात आले होते. त्यावेळी मुथुवेल यांनी आरोग्य कर्मचार्‍यांना पाहिले आणि त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी थेट झाडावर चढण्याचा मार्ग पत्कारला. एवढेच नव्हे झाडावर चढल्यानंतर मुथुवेल यांनी झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्यास सुरुवात केली. यावेळी आरोग्य कर्मचारी आणि इतरांनी त्यांना खाली येऊन लस घेण्याची विनंती केली, त्यावेळी त्यांनी आपल्याला जर लस टोचायची असेल तर, आरोग्य कर्मचाऱ्यांना झाडावर चढून लस द्यावी असे आव्हान केले. (Corona Vaccination Drive In India)

Vaccination
लस न घेणाऱ्यांनो...सरकारी योजनांपासून राहाल वंचित

दरम्यान, मुथुवेल यांना तेथे उपस्थित अनेकांनी लस घेण्यासाठी खाली या असे समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते काही केल्या ऐकत नसल्याचे आणि झाडावरून खाली उतरत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी अखेर तेथून परत जाण्याचा निर्णय घेतला. पुदुच्चेरी सरकारच्या नव्या आदेशाप्रमाणे आरोग्य कर्मचारी 100 टक्के लसीकरणाचा लक्ष्य साध्य करण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून हे कर्मचारी या गावात गेले होते त्यावेळी हा मजेशीर प्रकार समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.