Smriti Irani: महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणींचा विरोध; म्हणाल्या, हे अपंगत्व...

राज्यसभेत राजद खासदार मोनजकुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
Smriti Irani
Smriti Irani esakal
Updated on

नवी दिल्ली : महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे. राज्यसभेत राजद खासदार मोनजकुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे. त्यांच्या या विधानामुळं अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. (Menstruation not a handicap Smriti Irani opposes paid period leave for women)

Smriti Irani
Smriti Irani on Udayanidhi: "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत..."; सनातनविरोधी विधानावरुन स्मृती इराणींचा उदयनिधींना प्रत्युत्तर

स्मृती इराणी या मुद्द्यावर बोलताना इराणी म्हणाल्या, “मासिक पाळी येणारी स्त्री आणि मासिक पाळी हे अपंगत्व नाही तर स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा नैसर्गिक भाग आहे. जर मासिक पाळीच्या मुद्द्यावरुन महिलांना सुट्टी दिली गेली तर त्यांच्याशी भेदभाव होऊ शकतो. आपण असे मुद्दे उपस्थित करता कामा नये ज्यामुळं महिलांना समान संधींपासून वंचित रहावं लागेल" (Latest Marathi News)

Smriti Irani
Congress MP Suspended: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांचा गोंधळ; काँग्रेसच्या 5 खासदारांचं निलंबन!

पण मासिकपाळीच्या काळातील स्वच्छतेचं महत्व स्विकारताना इराणींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे एक राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्याची घोषणा केली. या धोरणाचा उद्देश देशभरात योग्य मासिक पाळी स्वच्छता उपायांबाबत जागरुकता निर्माण करणं आहे. (Marathi Tajya Batmya)

Smriti Irani
अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये बॉम्ब बनवत होता विद्यार्थी; स्फोट झाल्याने गंभीर जखमी

दरम्यान, यावेळी इराणी यांनी सांगितलं की, सध्याच्या मासिक पाळी स्वच्छता मोहिमेचा उद्देश १० ते १९ वर्षीय मुलींसाठी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे समर्पित ही योजना विविध शिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमांद्वारे मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबाबत ज्ञान वाढवण्यावर केंद्रीत करणारी आहे. (Latest Marathi News)

Smriti Irani
Maratha Reservation : 'येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..'; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा

दरम्यान, भारतात खासगी आणि सरकारी महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मासिक पाळीची सुट्टी बंधनकारक करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही, असं उत्तर ८ डिसेंबर रोजी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना इराणी यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.