Mercedes Benz : संतोष अय्यर होणार मर्सिडीज बेंझ इंडियाचे नवे CEO

अय्यर यांना मर्सिडीज बेंझ इंडियाचे सीईओ म्हणून बढती देण्यात आलीय.
Mercedes Benz India CEO Santosh Iyer
Mercedes Benz India CEO Santosh Iyeresakal
Updated on
Summary

अय्यर यांना मर्सिडीज बेंझ इंडियाचे सीईओ म्हणून बढती देण्यात आलीय.

नवी दिल्ली : ग्राहक सेवा आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे उपाध्यक्ष संतोष अय्यर (Santosh Iyer) यांना मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) इंडियाचे सीईओ (India CEO) म्हणून बढती देण्यात आलीय. १ जानेवारी २०२३ पासून अय्यर हे कंपनीचा कारभार हाती घेतील. सध्याचे सीईओ मार्टिन श्वेंक मर्सिडीज बेंझ थायलंडचा कारभार सांभाळतील.

मार्टिन श्वेंक (Martin Schwenk) यांनी मर्सिडीज-बेंझला ऑटोमोटिव्ह उद्योगांच्या भविष्यातील बदलासाठी इलेक्टिफिकेशन आणि डिजिटिलायजेशचा पुरेपूर वापर केला. कोरोना काळातही त्यांनी कंपनी यशस्वीरित्या चालवली.

Mercedes Benz India CEO Santosh Iyer
Anna Hazare : जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेचीही नशा असते; अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारलं

कोण आहेत संतोष अय्यर

संतोष अय्यर २००९ मध्ये कंपनीत उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. २०१९ मध्ये ते सध्याच्या पदावर पोहोचले. ग्राहक सेवा आणि कॉर्पोरेट घडामोडींचे उपाध्यक्ष म्हणून अय्यर यांनी उद्योग बेंचमार्क, ग्राहक सेवा उपक्रम आणि लक्झरी सेगमेंटमधील सेवा भिन्नतेद्वारे ‘मर्सिडीज ऑफ सर्व्हिस’ या ब्रँडचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीचे विक्री आणि विपणन प्रमुख म्हणून संतोष अय्यर यांनी गेली सात वर्षे कंपनी सर्वोच्च स्थानावर ठेवली होती.

Mercedes Benz India CEO Santosh Iyer
Sharad Pawar : आगामी लोकसभेपर्यंत शरद पवारांचा प्रभाव कमी होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

कंपनी एका रोमांचक आणि इलेक्ट्रिफाइंग भविष्याकडे वाटचाल करत आहे. मर्सिडीज-बेंझ सारख्या ब्रॅंडचे प्रतिनीधित्व करणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्याकडं एक यशस्वी टीम असून कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यास मी उत्सुक आहे, अशी भावना अय्यर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.