France Educational Visa: फ्रान्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत महत्वाची माहिती; "पैसा नसला तरी..."

फ्रान्सच्या काऊन्सेलर जनरलनं पुण्यात ही माहिती दिली आहे.
France Visa
France Visa
Updated on

पुणे : युके आणि विशेषतः फ्रान्समध्ये शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत महत्वाची माहिती फ्रान्सचे काऊन्सिल जनरल जीन मार्क सेरे चार्टेल यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. त्यांनी म्हटलं की, भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षणासाठी केवळ मेरिट आणि प्रोत्साहन याच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, हे त्यांना व्हिसा मिळवण्यासाठी महत्वाचं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (merit enough for indians to study in france counsul general)

France Visa
Pune Traffic: राजभवनजवळ कंटेनर पलटला; बाणेर, औंध रोडवर सकाळीच वाहतूक कोंडी

चार्टेल म्हणाले, जगभरातील अनेक टॉपची विद्यापीठं ही फ्रान्समध्ये आहेत. तिथल्या सरकारनं शिक्षणावर दिलेल्या अनुदानीत व्यवस्थेमुळं विद्यार्थ्यांना कुठल्याही मोठ्या कर्जांच्या ओझ्याशिवाय नोकऱ्याही सहज उपलब्ध होत आहेत. अशी शैक्षणिक कर्जे घेऊन त्यांना आय़ुष्यभर ती फेडत बसण्याची गरज नाही. (Latest Maharashtra News)

France Visa
Old Age Pension: वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही! सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

चार्टेल यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विधानाचा पुनरुच्चार करताना म्हटलं की, २०३० पर्यंत ३०,००० विद्यार्थ्यांनी फ्रान्समध्ये शिक्षणासाठी येतील अशी अपेक्षा आहे. सध्या विद्यार्थ्यांची ही संख्या ८००० इतकी आहे. फ्रान्सचं सरकार सध्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप्स आणि एक्स्चेंज प्रोग्रामवर काम करत आहे, असंही चार्टेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

France Visa
Ganpat Gaikwad Firing: गोळीबार प्रकरणात SIT स्थापन; गुन्ह्याची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली, आमदारकी जाणार?

२० वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये इंग्रजीचं पुरेस ज्ञान नव्हतं. आता फ्रान्समधील प्राध्यापक आणि कर्मचारी स्वतःला फ्रेन्चऐवजी इंग्रजी भाषेत चांगल्याप्रकारे व्यक्त होत आहेत. फ्रान्समध्ये आता इंग्रजी शिकवणं हे खूपच सामान्य झालं आहे. त्यामुळं भारतीयांना आता फ्रेन्च भाषा येत नसेल तरी ते फ्रान्समध्ये चांगल्याप्रकारे संवाद साधू शकतात. (Latest Marathi News)

France Visa
AI Jobs: AIच्या जगात नोकरी शोधताय? चक्क देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या...

फ्रान्समध्ये सध्या कोणत्याही परदेशी विद्यार्थ्यासाठी पाच वर्षांसाठी 'मल्टिपल एन्ट्री शॉर्ट स्टे व्हिसा' दिला जातो. या विद्यार्थ्यांना फक्त कमीत कमी एका सेमिस्टरची फी (बॅचलर किंवा मास्टर्स) भरावी लागेल. एक्स्चेंज प्रोग्रामासाठीही हा नियम लागू आहे, असंही काऊन्सिल जनरल चार्टेल यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.