Chandrayaan 3: मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ! अवघ्या 60 सेकंदात पाहा चांद्रयान 3 च्या लाँच-टू-लँड प्रवास

अवघ्या २४ तासात चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष याकडे आहे.
Chandrayaan 3 It will land in southern hemisphere of moon on August 23 at 5 47 pm
Chandrayaan 3 It will land in southern hemisphere of moon on August 23 at 5 47 pmisro.dos
Updated on

Chandrayaan 3 Mission : भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेची सध्या जगभर चर्चा आहे. उद्या संध्याकाळी ६ वाजता चांद्रयानातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. यापार्श्वभूमीवर या मोहिमेच्या लॉन्चपासून लँडिंगपर्यंतचा प्रवास अवघ्या ६० सेकंदात आपल्या पाहता येणार आहे. याचा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीनं प्रसारित केला आहे. (Mesmerising Video Captures Chandrayaan 3 Launch to Land Journey In Just 60 second)

चांद्रयान ३ मोहीम 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून लॉन्च करण्यात आलं होतं. यानंतर ते प्रत्यक्ष चंद्रावर पोहोचण्यासाठी ४० दिवस लागणार होते. यासाठी आता केवळ २४ तासांहून कमी कालावधी उरला आहे. त्यामुळं सर्व काही योजनेनुसार झाल्यास, भारताची ही कामगिरी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.

चांद्रयान ३ उद्या चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी ही कामगिरी यूएसएसआर, अमेरिका आणि चीननं केली आहे. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वसाहत होऊ शकेल का? याच्या शोधापासून ते चंद्राच्या पृष्ठभागाची खनिज रचना समजून घेण्यापर्यंत चांद्रयान-3 चं यश भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला चालना देऊ शकते.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, चांद्रयान 3 नं सन 2019 पासून चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान 2 मिशनच्या ऑर्बिटरशी संपर्क संपर्क स्थापित केला आहे. यावेळी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं चांद्रयान-3 च्या लँडरला "स्वागत आहे मित्रा!" असा संदेशही दिला. इस्रोनं सोमवारी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, "दोन्हींमध्ये संवाद स्थापित झाला आहे"

चांद्रयान ३ च्या लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झालं आहे आणि नंतरचे 25 किमी x 134 किमी उंचीवर चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. प्रोपल्शन मॉड्यूलची प्रणाली तपासली जात आहे आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साइटवर सुर्योदयाची वाट पाहत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता हे यान चंद्रावर उतरणं अपेक्षित आहे,” अशी माहिती इस्त्रोनं दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.