कुठे पाऊस तर कुठे उन्हापासून दिलासा; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Cloud
Cloud
Updated on

नवी दिल्ली : उत्तर भारतात कडक ऊन आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भाग उष्णतेने ग्रासले आहेत. अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येईल आणि लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान (Meteorological Department) खात्याने वर्तवला आहे. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण (Cloudy) राहणार व धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या अनेक भागात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र, येथे फारसा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

Cloud
नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...

१३ ते १६ एप्रिल दरम्यान केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडच्या आठ जिल्ह्यांमध्ये १३ आणि १४ एप्रिल रोजी पाऊस आणि गारपीट होऊ शकते. चमोली, उत्तरकाशी, टिहरी, पौरी, डेहराडून, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उष्णतेपासून दिलासा मिळणार

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर-पश्चिम भारतात दिसायला सुरुवात झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि दिल्लीत उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. याशिवाय तामिळनाडू, केरळ, आसाम आणि लगतच्या भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.