Metro And Railway Track Difference : आपल्यापैकी बहुतेकांनी रेल्वेने आणि मेट्रोने नक्कीच प्रवास केला असेल, काहींनी केला नसेल पण, रेल्वे आणि मेट्रो ट्रॅक एकदातरी नक्कीच पाहिला असेल.
हे दोन्ही ट्रॅक पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल आणि तो म्हणजे मेट्रो ट्रॅकवर खडी नसते मग रेल्वे ट्रॅकवर का असते? आज आम्ही तुम्हाला या दोन्ही ट्रॅकमध्ये फरक का असतो या मागचं विज्ञान सांगणार आहोत.
रेल्वे रुळांवर लहान गिट्टी किंवा दगड असतात हे तुम्ही पाहिले असेल. पण, मेट्रो ट्रॅकवर हे अशाप्रकारची खडी किंवा दगड टाकलेले नसतात. या दोन्ही ट्रॅकमधील फरक जाणून घेण्यापूर्वी रेल्वे ट्रॅकवर खडी का टाकलेली असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
...म्हणून रेल्वे ट्रॅकवर असते खडी
रेल्वे ट्रॅकवर असलेल्या दगडांना गिट्टी असे म्हटले जाते. जेव्हा ट्रेन रुळांवरून धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कंपनं आणि आवाज निर्माण होतो. निर्माण होणारी ही कंपने आणि आवाज कमी करण्याचे काम रेल्वे ट्रॅकवरील गिट्टी करते. याशिवाय कंपनांमुळे स्पीपर्स विभागले जाऊ शकतात. मात्र, गिट्टीमुळे हे स्पीपर्स पसरण्यापासून रोखले जातात. परंतु, रेल्वे ट्रॅकवरील या गिट्टीच्या देखभालीसाठी मोठा खर्च येतो. तसेच देखभालीसाठी बहुतेकवेळा रेल्वेचा ब्लॉकही घ्यावा लागतो. याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर आणि प्रवाशांवर होतो.
यामुळे मेट्रो ट्रॅकवर खडी टाकलेली नसते
रेल्वे ट्रॅकच्या तुलनेत मेट्रो ट्रॅक हे तुलनेने अधिक व्यस्त असतात. त्यामुळे येथे शक्यतो ब्लॉक घेतला जात नाही. मेट्रो ट्रॅक हे एकतर जमिनीखाली किंवा जमिनीच्या वर बनवले जातात. यामुळे गिट्टी ट्रॅकची देखभाल करणे शक्य होत नाही.
रेल्वेच्या तुलनेत मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या अंदाजे दर 5 मिनिटांनी असते, त्यामुळे हे ट्रॅक ब्लॉक करणे सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेच मेट्रोचे ट्रॅक गिट्टीशिवाय काँक्रीटपासून बनवावे लागतात. मेट्रो ट्रॅक बनवण्याचा खर्च थोडा जास्त असला तरी, त्यांची देखभाल रेल्वे ट्रॅकच्या तुलनेत अगदीच नगण्य असते. बॅलास्ट-फ्री ट्रॅकमध्ये कंपनं शोषून घेण्यासाठी विविध डिझाइन्स असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.