नवी दिल्ली- गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये पाच नवे जिल्हे तयार करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. लडाखमधे आता नवे 5 जिल्हे असणार आहेत. गृह मंत्रालयाने नव्या जिल्ह्यांची यादी जारी केली आहे.
जांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवे 5 जिल्हे असणार आहेत. काही वर्षांपूर्वी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा डाव खेळला असल्याचं बोललं जात आहे.