राजस्थानमधील उदयपूर शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची(Kanhaiya Lal murdered in Udaipur) घटना घडली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, कन्हैया लालच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.
उदयपूरची ही घटना समोर आल्यानंतर राजस्थान सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळं आरोपींना अटक केल्यानंतर तातडीनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीमही या प्रकरणाच्या तपासासाठी राजस्थानला रवाना झाली आहे. एनआयएचे चार सदस्यीय पथक तपास करणार आहे. या घटनेचा इस्लामिक संघटनेशी काही संबंध आहे का? विशेषत: पाकिस्तानचे कनेक्शन आहे की नाही? याची चौकशी करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर संपूर्ण उदयपूर शहरात तणावाचे वातावरण आहे. शेकडो लोक आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर उदयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात कलम-144 लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही 24 तास बंद ठेवण्यात आली आहे.
एजीडी, आयजी, एसपी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयपूरमधील संवेदनशील भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. धनमंडी, घंटाघर, हाथीपोल, अंबामाता, सूरजपोल, भूपालपुरा आणि सविना भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या प्रकरणावर राजस्थानच्या लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर राज्यभरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.