MiG-29 Fighter Aircraft : चीन-पाकिस्तानला मिळणार सडेतोड उत्तर! काश्मीरमध्ये तैनात झाले मिग-२९

MiG-29 fighter aircraft deployed in Srinagar Jammu Kashmir replacing the MiG-21 fighter jets at the base
MiG-29 fighter aircraft deployed in Srinagar Jammu Kashmir replacing the MiG-21 fighter jets at the base
Updated on

Indian Airforce : भारतीय हवाई दलाने सीमाभागात देशाच्या सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या मोक्याच्या भागात संरक्षण स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग-२९ लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केली आहे.

जम्मू-काश्मीर हे पाकिस्तान-चीन सीमेला लागून आहे. अशा स्थितीत येथील एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्याबाबत खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचे रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वाड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आले आहे. ट्रायडंट्स स्क्वाड्रनला सैन्यात 'डिफेंडर ऑफ द नॉर्थ' असेही म्हणतात.

MiG-29 fighter aircraft deployed in Srinagar Jammu Kashmir replacing the MiG-21 fighter jets at the base
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. येथे दोन्ही प्रतिस्पर्धी देशांची (चीन आणि पाकिस्तान) सीमा जवळ आहे, अशा परिस्थितीत कमीत कमी वेळात वेगवान प्रतिसाद देणार्‍या विमानांची गरज होती. मिग-२९ हे विमान यासाठी योग्य आहे कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम एव्हियोनिक्स आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.(Latest Marathi News)

MiG-29 fighter aircraft deployed in Srinagar Jammu Kashmir replacing the MiG-21 fighter jets at the base
Nawab Malik : "नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले"; मलिकांना १६ महिन्यांनंतर जामीन, ठाकरे गटाच्या नेत्याचं खोचक वक्तव्य

त्यांनी सांगितले की, अपग्रेड केल्यानंतर मिग-२९ मध्ये हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रेही आहेत. सरकारने हवाई दलाला आणीबाणीच्या परिस्थितीत जी शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे, ती शस्त्रे विमानातूनही लाँच करता येतील.

मिग-२९ ची खासियत काय आहे?

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिग-२९ मध्ये संघर्ष काळात शत्रूच्या लढाऊ विमानांना जॅम करण्याची क्षमताही आहे. हे विमान रात्री देखील उड्डाण करत लष्कराचे महत्त्वाचे ऑपरेशन्स पूर्ण करण्यास सक्षम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com