राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ भारत - पाक सीमेवर भारतीय हवाई दलाचे MiG21 विमान कोसळले.
तामिळनाडुत (Tamilnadu) सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आता आणखी एक प्लेन क्रॅशची घटना घडली आहे. राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ भारत - पाक सीमेवर हवाई दलाचे MiG21 विमान कोसळले. यामध्ये विंग कमांडर हर्षित सिन्हा (Harshit Sinha)यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री या घटनेची माहिती हवाई दलाने दिली.
मिग २१ विमान कशामुळे कोसळले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. खराब हवामान की तांत्रिक अडचण आली याची आता हवाई दलाकडून सविस्तर चौकशी केली जाईळ. भारत-पाक सीमेजवळ ही दुर्घटान घडली असून याची माहिती हवाई दलाने ट्विटरवरून दिली आहे.
विमान कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला. या आवाजाने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तसंच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. पायलट या दुर्घटनेत होरपळला होता, त्यातच पायलटचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडुत भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एक दुर्घटना घडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.