Balakot Surgical Strike : ....पाकिस्तान भारतावर करणार होता अणुहल्ला, कारण...

India Pakistan
India Pakistan
Updated on

नवी दिल्ली - अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी पाकिस्तानबाबत धक्कागायक दावा केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताने बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याच्या तयारीत होता, पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे. ( Balakot Surgical Strike news in Marathi)

India Pakistan
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांची दादागिरी सुरूच, प्राचार्यांनाच केली मारहाण

माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी आपल्या 'नेव्हर गिव्ह अॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' या पुस्तकात म्हटले की, अणुहल्ल्याची ही माहिती त्यांना तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती. २७-२८ फेब्रुवारी २०१९ रोजी ही घटना घडली, तेव्हा अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी मी हनोई येथे होतो, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांच्या टीमने नवी दिल्ली आणि इस्लामाबादशी चर्चा केली.

India Pakistan
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावानंतर आता नवीन राज्यपाल...

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या किती जवळ आले होते, हे जगाला कळलं असेल असं मला वाटत नाही. "खरं सांगायचं तर मला देखील याचं उत्तरही माहित नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईक केली होती.

माइक पॉम्पिओ म्हणाले की, व्हिएतनाममधील हनोईमध्ये असलेली ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही. मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी अणुहल्ल्याबाबत चर्चा केली होती. भारताचं काय म्हणणं आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. मात्र बाजवा यांनी सर्जिकल स्ट्राईकला चूक म्हटलं होतं. दुसरीकडे पॉम्पिओ यांच्या दाव्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.