Hijab Row : ओवैसींनी टोचले पाकिस्तानचे कान म्हणाले... “हमारा घर...‘’

उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत बोलत होते.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on

लखनऊ : देशभरात गाजत असलेल्या कर्नाटकातील हिजाब (Hijab Issue) प्रकरणावर अनेक स्तरातून टीका करण्यात येत असून, भारतातील या प्रकरणावर शेजारील देश पाकिस्ताननेदेखील (Pakistan) टीका केली होती. दरम्यान, पाकिस्तानच्या या टीकेवर एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asadussin Owaisi) यांनी जोरदार प्रतिउत्तर देत पाकिस्तानाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. ते उत्तर प्रदेशमधील एका प्रचारसभेत बोलत होते त्यावेळी त्यांनी या प्रकरणावरून पाकिस्तानचे कान टोचले आहेत. (MIM Chief Asadussin Owaisi Warn Pakistan )

ओवैसी म्हणाले की, “मलालावर (Malala Yousafzai) हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की, हा आमचा घरातील प्रश्न आहे यामध्ये तुम्ही मध्ये-मध्ये करू नका, अन्यथा जखमी व्हाल असे विधान ओवैसी यांनी केले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची टीका

दरम्यान, कर्नाटकात हिजाब घालून येणाऱ्या मुलींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याप्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्वीट करत भारतावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी “मुस्लीम महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. तसेच या अधिकारापासून कुणालाही वंचित ठेवणे आणि हिजाब घातला म्हणून त्यांना दहशतीत ठेवणे ही जबरदस्ती असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय मुस्लिमांवर भारतातील एक राज्य दबाव टाकत आहे याची जगाने दखल घेण्याचाही उल्लेख ट्वीटमध्ये केला होता. त्यांच्या या ट्वीटला ओवैसी यांनी जोरदार प्रतिउत्तर देत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.