उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Eelections 2022) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि जन अधिकार पक्षाचे बाबू सिंह कुशवाह (Babu Singh Kushwaha) यांच्यासह मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन मेश्राम (Waman Meshram) यांनी शनिवारी 'भागीदारी परिवर्तन मोर्चा' ही नवीन आघाडी स्थापन केली. शनिवारी पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी नव्या युतीची घोषणा केली आणि 'भागीदारी परिवर्तन मोर्चा' राज्यातील सर्व 403 विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली. बाबू सिंह कुशवाह यांना 'भागीदारी परिवर्तन मोर्चा'चे निमंत्रक बनवण्यात आले आहे.
ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या आघाडीला बहुमत मिळाल्यास राज्यात दोन मुख्यमंत्री केले जातील. त्यानुसार एक मुख्यमंत्री दलित समाजातील आणि दुसरा मागासवर्गीय (OBC) समुदायातील असेल. याशिवाय तीन उपमुख्यमंत्री केले जातील, त्यापैकी एक मुस्लिम समाजातील असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बाबू सिंह कुशवाह म्हणाले की, आमच्या युतीचे दरवाजे बंद नाहीत. इतर पक्षही आमच्यासोबत येऊ शकतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील लढतीमध्ये आता 'भागीदारी परिवर्तन मोर्चा' देखील असणार आहे. त्यामुळे आता सपा आघाडी तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असा दावाही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.