Lok Sabha Elections 2024: 85 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मतदानासाठी केंद्रावरच जावं लागणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Lok Sabha Elections 2024: केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली आहे. गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठांचा पॅटर्न पाहून सरकारने काही महत्त्वपुर्ण बदल केले आहेत.
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024Esakal
Updated on

Lok Sabha Elections 2024: केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली आहे. केंद्र सरकारने पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची वयोमर्यादा 80 वरून 85 वर्षे केली आहे. म्हणजेच आता ८५ वर्षांखालील वृद्धांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. यापूर्वी 80 वर्षांवरील वृद्धांना पोस्टल बॅलेटची सुविधा होती.

केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आचार नियम (1961) मध्ये सुधारणा केली. गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठांच्या मतदानाचा पॅटर्न लक्षात घेऊन सरकारने हा बदल केला आहे. या निवडणुकांमध्ये 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 97 ते 98 टक्के वृद्धांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याऐवजी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणे पसंत केले. हे लक्षात घेऊन सरकारने 2020 मध्ये केलेल्या या तरतुदीत सुधारणा केली आहे.

Lok Sabha Elections 2024
Rameshwaram Cafe blast: 28 ते 30 वर्षाचा तरुण कॅफेत आला, इडली मागवली अन्..;डीके शिवकुमार यांनी दिली महत्त्वाची माहिती

निवडणूक संचालन नियमांच्या नियम 27A नुसार, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेले कर्मचारी आणि सैन्य दलातील जवानांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत कोविड-संक्रमित व्यक्तींनाही ही सुविधा महामारीच्या काळात देण्यात आली होती.

मतमोजणी दरम्यान, सहसा पोस्टल मतपत्रिका आधी मोजली जाते. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी केली जाते. पोस्टल मतपत्रिकांची संख्या कमी आहे आणि त्या कागदी मतपत्रिका आहेत, त्यामुळे त्यांची सहज मोजणी केली जाते.

Lok Sabha Elections 2024
Pakistan Lashkar Terrorist: मोठी बातमी! भारताचा आणखीन एक शत्रू पाकिस्तानात ठार; 'हा' लष्कर दहशतवादी होता '26/11'चा मास्टरमाइंड

TOI अहवालानुसार, निवडणूक आयोगाने नुकत्याच विधानसभा निवडणुका झालेल्या 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत असे दिसून आले की, 80 वर्षांवरील मतदारांपैकी फक्त 2-3% मतदारांनी पोस्टल मतदानाचा पर्याय निवडला होता. उर्वरितांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर येण्याचा निर्णय घेतला. देशभरात 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची एकूण संख्या 1.75 कोटी आहे, त्यापैकी 80-85 वर्षे वयोगटातील 98 लाख आहेत.

Lok Sabha Elections 2024
Nitin Gadkari: अर्धी मुलाखत पोस्ट करणं पडलं महागात! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली कायदेशीर नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()