भाजप सरकार दबावाखाली; मंत्री ईश्वरप्पा शुक्रवारी देतील राजीनामा

Minister KS Eshwarappa will resign on Friday
Minister KS Eshwarappa will resign on FridayMinister KS Eshwarappa will resign on Friday
Updated on

कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर (suicide) चर्चेत आलेले कर्नाटक राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) शुक्रवारी (ता. १५) राजीनामा देतील. शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द करेल, असे ईश्वरप्पा यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. (Minister KS Eshwarappa will resign on Friday)

अलीकडेच ३७ वर्षीय कंत्राटदार संतोष के पाटील यांचा मृतदेह उडुपी येथील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला होता. सुसाईड नोटमध्ये त्यांनी मंत्री ईश्वरप्पा यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यामुळे केएस ईश्वरप्पा यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांनी मंत्री ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सांगितले होते.

संतोष पाटील यांचा मृतदेह (suicide) संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यानंतर विरोधी काँग्रेसने राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना ईश्वरप्पा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विनंती केली होती. मात्र, ईश्वरप्पा यांनी बुधवारी पायउतार होण्यास नकार दिला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी ईश्वरप्पा यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले होते.

Minister KS Eshwarappa will resign on Friday
प्रेम, लैंगिक संबंध अन् खून; पोलिसांनी केली विक्षिप्त किलरला अटक

कंत्राटदार संतोष पाटील यांनी ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला होता. कंत्राटदाराने व्हॉट्सॲप मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मेसेजमध्ये त्यांनी ईश्वरप्पा यांना मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध उडुपी पोलिस ठाण्यात आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाटील यांच्या भावानं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ईश्वरप्पा आणि त्यांचे दोन कर्मचारी रमेश आणि बसवराज यांचे आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे, हे विशेष...

निकालाच्या आधारे पुढील कारवाई ठरवू

मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. प्राथमिक तपास सुरू होऊ द्या. तपासणीच्या निकालाच्या आधारे पुढील कारवाई ठरवू. मात्र, पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांना राजीनामा द्यावा लागेल, अशा स्पष्ट सूचना भाजप हायकमांडने राज्य सरकारला दिल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.