Crime News: रिक्षात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरडाओरडा करताच रिक्षातून बाहेर फेकलं अन्...

बिहारमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहेत
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

बिहारमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहेत. अशातच आता बिहारच्या गयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गया येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने विरोध केल्यावर दोघांनी तिला धावत्या ऑटोतून बाहेर फेकून दिले.(Latest Marathi News)

टनकुप्पा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारा गावाजवळील शिव मंदिराजवळ ही घटना घडली आहे. ही घटना रविवारी (11 जून) रोजी रात्री उशिरा घडली. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दारम्यान सोमवारी (12 जून) तिचा मृत्यू झाला.(Marathi Tajya Batmya)

Crime News
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ 48 तासांत भारतात धडकणार! गुजरात ऑरेंज अलर्ट मोडवर

रविवारी दुपारी एक ऑटोचालक आणि त्याच्या साथीदाराने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करताच या नराधमांनी तिला धावत्या रिक्षामधून खाली फेकून दिले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला.(Latest Marathi News)

Crime News
Eknath Shinde: शिवसेनेच्या 4 मंत्र्यांना डच्चू मिळणार? मुख्यमंत्र्यांनी रात्री घेतली तातडीची बैठक

बरतारा मार्केट येथून रविवारी एका रिक्षाचालकाने १५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने रिक्षात बसवलं. ऑटोचालकासोबत आणखी एक साथीदार त्याच्यासोबत रिक्षात होता. यावेळी मुलीने विरोध केला आणि आरडाओरडा सुरू केला. मुलगी आरडाओरडा करत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी रिक्षाचा पाठलाग केला. त्यानंतर गावकरी आपला पाठलाग करत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने धावत्या रिक्षातून मुलीला बाहेर फेकलं. ग्रामस्थांनी ऑटोचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.(Marathi Tajya Batmya)

Crime News
मोठा निर्णय! प्रश्नपत्रिका वाचायला मिळणारे १० मिनिटे आता बंद; पेपर सुरु झाल्यावरच मिळणार प्रश्नपत्रिका

या संपूर्ण प्रकरणात गयाचे एसएसपी आशिष भारती यांनी सांगितले की, टनकुप्पा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका ऑटोमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला चालत्या रिक्षातून बाहेर फेकून दिले होते. याप्रकरणी ग्रामस्थांच्या मदतीने ऑटोचालक पिंटू कुमार याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.