राहुल गांधींकडून पीडितांचा फोटो ट्विटरवर; NCPCR कडून कारवाईची मागणी

राहुल गांधींकडून पीडितांचा फोटो ट्विटरवर; NCPCR कडून कारवाईची मागणी
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर कारवाई करण्याची मागणी ट्विटर इंडियाकडे केली आहे. राहुल गांधींवर आरोप आहे की, त्यांनी दिल्ली सामुहिक बलात्कार पीडितेची ओळख उघड केली आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधी यांचं ट्विट हटवण्यासोबतच त्यांच्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पीडित परिवाराचा फोटो ट्विट केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार, बलात्कार पीडितेची ओळख कोणत्याही प्रकारे उघड करणे चुकीचे आहे. यानुसार शिक्षा देखील होऊ शकते. याआधी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर दिल्लीतील नांगल बलात्कार पीडितेची ओळख उघड करण्याबाबत आणि आपला राजकीय अजेंडा राबवण्याचा आरोप केला होता. त्यांनी राहुल गांधींविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे.

राहुल गांधींकडून पीडितांचा फोटो ट्विटरवर; NCPCR कडून कारवाईची मागणी
पदवी प्रवेशासाठी CET नाही; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण

राहुल गांधी यांनी आज बुधवारी ९ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांना भेटून संपूर्ण मदत करण्याचा विश्वास दिला. काही दिवसांपूर्वी या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यासोबत अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या केली असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील छावणी परिसरात जाऊन या कुटुंबियांशी भेट घेतली तसेच न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देत विश्वास देऊ केला. यावेळी अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गांधींकडून पीडितांचा फोटो ट्विटरवर; NCPCR कडून कारवाईची मागणी
कोरोनाची भीती, वडिलांचा मृतदेह 3 दिवस घरातच; मुलीचीही आत्महत्या

राहुल गांधी यांनी या पीडितेच्या आई-वडिलांसोबत भेट घेतल्याचा फोटो ट्विट करत म्हटलंय की, आई-वडिलांचे अश्रु फक्त एकच गोष्ट सांगताहेत की त्यांची मुलगी, या देशाची मुलगी न्यायास पात्र आहे. आणि न्याय मिळवून देण्याच्या या मार्गावर मी त्यांच्या सोबत आहे.

पीडित परिवाराने असा आरोप केलाय की, दक्षिण पश्चिम दिल्लीतील जुन्या नांगल गावामधील स्मशान घाटाच्या पुजाऱ्याने त्यांच्या सहमतीशिवायच मुलीवर अंत्यसंस्कार केलेत. पोलिसांनी त्या पुजाऱ्यासहित इतर चार लोकांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.