लखनौ : एका घटनेनं राजधानीतील पोलीस दलात खळबळ उडालीय. खरंतर, लखनौमधील शहीद पथ येथून ट्रेलरमध्ये ठेवलेल्या लढाऊ जेट विमानाच्या (Fighter Jet Aircraft) पाच चाकांपैकी एक चाक चोरट्यांनी चोरुन नेलंय. फायटर जेट (Fighter Jet Aircraft) विमानाचे चोरीला गेलेले चाक शोधण्यासाठी पोलीस विभाग सध्या अलर्ट मोडवर आहे. सध्या शहीद पथावर पोलिसांकडून सखोल वाहन तपासणी मोहीम (Vehicle Checking Campaign) राबविण्यात येत आहे. यासोबतच राजधानीबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांची सखोल तपासणी मोहीम सुरूय. फायटर जेटचे एक चाक चोरीला जाऊन जवळ-जवळ सात-आठ तास उलटला. मात्र, आजतागायत चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेमागं देशाच्या शत्रूंचाही हात असण्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. या प्रकरणी ट्रेलर चालकानं आशियाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय.
शहीद पथावर ही घटना घडल्यानं शहीद पथ (Shaheed Path) काही काळ जाम झाला होता. दरम्यान, फायटर जेटच्या (Fighter Jet) ट्रेलरमधून चोरटे गायब झाले आहेत. सध्या ट्रेलर ताब्यात घेऊन लष्कराचे जवान ट्रेलर चालकाची चौकशी करत आहेत. फायटर जेटची ही पाच चाके बक्षीच्या तालाब एअरबेसवरून जोधपूर एअरबेसपर्यंत (Jodhpur Airbase) नेल्या जाणाऱ्या ट्रेलरवर लोड करण्यात आली होती. शहीद पथ ठप्प असल्याने ट्रक संथगतीने जात असताना चोरट्यांनी रात्री 12.30 ते 1 च्या दरम्यान चोरी केल्याचे ट्रक चालकानं सांगितलं. डीसीपी अमित कुमार यांनी सांगितलं, की ही घटना 27 नोव्हेंबर रोजी घडली आणि 1 डिसेंबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला असून दोषींना लवकरच अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय. शहीद पथावर ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींची छाननी करण्यात येत आहे. सध्या शहीद पथावर पोलिसांची सखोल वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या घटनेच्या संदर्भात पोलिसांना आतापर्यंत फक्त एवढाच सुगावा लागला आहे, की चोरटे स्कॉर्पिओवर स्वार झाले होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लढाऊ विमानाचं चाक विमानाव्यतिरिक्त कुठंही वापरता येणार नाही. या कारणास्तव हे चाक चोरण्याचा देशविरोधी शक्तींचा कट असू शकतो, असा संशय लष्करानं व्यक्त केलाय.
आशियाना पोलिस ठाण्याचे (Ashiana Police Station) निरीक्षक धीरज कुमार शुक्ला (Inspector Dheeraj Kumar Shukla) यांनी सांगितलं की, शहीद पथाच्या आजूबाजूच्या सर्व इमारतींवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तर, बीकेटीच्या एअरफोर्स स्टेशनपासून (Airforce Station) घटना घडेपर्यंत सर्व ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी सुरूय. यासोबतच राजधानीच्या बाहेर जाणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून, या सर्व रस्त्यांवर वाहनांची सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यांनी फायटर प्लेनची चाके चोरली ते आतापर्यंत राजधानीतून बाहेर पडू शकले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या रस्त्यांवर प्रत्येक वाहनाची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.