केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी पत्रकारावर उगारला हात

लखीमपुर खेरी प्रकरणात त्यांच्या मुलावर गंभीर आरोप आहेत.
मिश्रा यांनी उगारला पत्रकारावर हात
मिश्रा यांनी उगारला पत्रकारावर हात sakal
Updated on

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेला आशीष मिश्रा याचे वडील व मोदी सरकारमधील गृह राज्यमंत्री अजय मिश्रा ‘टेनी’ यांनी पत्रकाराच्याच अंगावर हात टाकला तसेच पत्रकारांना शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ केलेल्या केंद्रावर जोरदार दबाव आला आहे. मिश्रा यांनी आपले मूळ रूप दाखवून एका पत्रकाराला ‘डोके ठिकाणावर आहे का? असे धमकावून धक्काबुक्की केली. यानंतर मात्र मिश्रा यांना वाचविणे अवघड बनल्याचे मत भाजपच्या सर्वोच्च वर्तुळात तयार झाल्याची माहिती आहे.वाराणसी दौऱ्याहून पंतप्रधान परत जाताच योगी आदित्यनाथ सरकारच्या एसआयटीने हे हत्याकांड नियोजनबद्ध कारस्थान असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. त्यामुळे मिश्रा यांना आज संध्याकाळी तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले असून रात्री उशिरा ते गृहमंत्री अमित शहा यांना भेटतील असे समजते.

मिश्रा यांनी उगारला पत्रकारावर हात
कलम 370 हटवल्यानंतरही काश्मीर खोऱ्यातील भूखंड खरेदी थंडच

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवरून घरवापसी करतेवेळीही मिश्रा यांची मंत्रिपदावरून त्वरित हकालपट्टी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागण्यांवर शेतकरी संघटना ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. मिश्रा पिता-पुत्रांनी चार शेतकऱ्यांसह आठ जणांची हत्या केली ते अजूनही केंद्रात मंत्री कसे आहेत, असे विचारतानाच टिकैत यांनी, ‘त्यांना तातडीने काढून टाकले नाही तर शेतकरी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसतील,’ असा इशारा दिला.

मिश्रा यांच्याविरुद्ध २००२ पासून विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा सूचना दिल्या होत्या. तथापि तेव्हा भाजपमधील तेव्हाच्या एका अतिप्रभावी गटानेच संघपरिवारातील युवा नेते असलेल्या मिश्रा यांना वाचविल्याचे सांगितले जाते.

आशिषच्या अडचणींत वाढ

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी याआधी बेपर्वाईने गाडी चालविणे, दुखापत पोहोचवणे असे गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रांच्या साह्याने इजा पोहोचवणे, नियोजनपूर्वक हल्ला करणे आणि शस्त्रपरवान्याचा दुरुपयोग असे गुन्हे वाढविण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होऊन आधीचे गुन्हे रद्द करून नव्याने गुन्हे दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी आणि मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिश्रा यांनी उगारला पत्रकारावर हात
गोव्याच्या मंत्र्याचा राजीनामा; सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा आरोप

भाजप खासदारांच्या चहापानापासून मिश्रा यांना दूरच ठेवले

पंतप्रधानांनी आज भाजप खासदारांना चहापानास बोलावले होते. त्यावेळी मिश्रा यांनी हजर राहू नये असे स्पष्ट बजावण्यात आले होते. मोदी गेले तीन दिवस वाराणसीत होते. लखीमपूर खेरी वाराणसीच्या जवळच असले तरी या कार्यक्रमांपासून मिश्रा यांना दूर ठेवण्यात आले होते. हे मिश्रा निवडणुकीत भाजपला भोवण्याची स्पष्ट चिन्हे असल्याचे योगी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री व अनेक भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातल्याची माहिती आहे. अधिकृतरीत्या भाजप नेते, ‘ मिश्रा उत्तर प्रदेशाचे गृह राज्यमंत्री नाहीत व आरोप त्यांच्या मुलावर आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा मोदी-शहा घेणार नाहीत. मोदी कधीच दबावाखाली येत नाहीत,‘ असे सांगत असले तरी त्यांचे चेहरे काही वेगळेच सांगत आहेत. सपा नेते अखिलेश यादव यांच्या सभांना जमणारी तुफान गर्दी पाहून भाजपला बिहार निवडणुकीतील तेजस्वी यादव यांच्या सभांची आठवण होऊ लागली आहे.

दिमाग खराब है क्या बे,माईक बंद कर बे : मिश्रा

पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी लखीमपूर खेरी असे नुसते म्हणतात अजय मिश्रा यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व्हायरल व्हिडिओनुसार मित्रा पत्रकाराच्या दिशेने झेपावले. मुर्खासारखे प्रश्न विचारू नकोस, असे बजावत त्यांनी दिमाग खराब है क्या बे, अशी भाषा वापरली. त्यांचा आवाज चढला होता. नंतर त्यांनी माईक बंद कर बे, असेही त्याला दरडावले. त्यांनी माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसते.

व्हिडिओवरून ते पत्रकारांना चोर म्हटल्याचेही ऐकू येते.हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याचे पडसाद दिल्लीत उमटले. सोशल मिडीयावरही मिश्रा यांना टीकेला सामोरे जावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()