तब्बल २२ वर्षानंतर भारताला मिस युनिवर्स किताब मिळवून देणारी हरनाज कौर संधू संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तिला शालेय जीवनापासूनच तिला तिच्या नाजूक प्रकृतिविषयी टोमणे मारले जायचे. याचा मनावर खोलवर परिणाम झाल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये म्हंटलं होतं. मुंबईत ती एका कार्यक्रमात आली असता तिला पत्रकारांनी मोदींच्या लोकप्रियतेबद्दल, रशिया-युक्रेन युद्धाबद्दल तिला आलेल्या अडथळ्यांबद्दल विचारलं. (Miss universe Harnaz sandhu)
'हिजाब' बद्दल अनेक घडामोडी घडतायत तर ती याविषयी काय विचार करते, असा प्रश्न विचारला. तेव्हा आयोजकांनी तिला राजकिय प्रश्न विचारण्यात येऊ नये असं म्हंटल, मात्र हरनाज कौर संधू हिने यावर अतिशय समर्पक उत्तर दिलंय. "नेहमी मुलींनाच का टार्गेट करता तुम्ही आता देखील तुम्ही मला टार्गेट करताय. हिजाबच्या विषयात देखील मुलींनाच टार्गेट केलं जातं. तिला जगू द्या जसं तिला जगायचं आहे. तिला आपले स्वप्न ,महत्वाकांक्षा पूर्ण करु द्या. तिला भरारी घेऊ द्या, तिची जिद्द तिचे पंख आहेत, तेच छाटू नका ...! छाटायचे असतील तर आपले छाटा."
कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरुन मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. १५ मार्चला कर्नाटक हायकोर्टाने हिजाब परिधान करण्यास शाळा-महाविद्यालय आवारात बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर कर्नाटकमधील आंदोलनकर्त्या मुलींनी सूप्रीमकोर्टात धाव घेतली. अनेक मुलींनी या निर्णयानंतर परिक्षांवर देखील बहिष्कार घातला. कोर्टाने निर्णय देताना ईस्लाममध्ये हिजाब ही आवश्यक बाब नसल्याचं म्हणत, आंदोनलकर्त्या मुलींच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येणार नसल्याचं नमूद केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.