नवी दिल्ली ः रशियाहून भारतात येणाऱ्या तेलवाहू जहाजावर लाल समुद्रात येमेनच्या हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात ‘द अँड्रोमेडा स्टार’ या तेलवाहू जहाजाचे नुकसान झाल्याचे त्याच्या मालकाने सांगितले. इराण समर्थक दहशतवादी गटाने याची जबाबदारी शनिवारी स्वीकारली.
रशियातील प्रिमोर्स्क येथून हे जहाज निघाले होते. भारतातील वाडिनारला ते जाणार होते. रशियाच्या व्यापारात या जहाजाचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. ‘एलएसईजी’ आणि अँब्रे या जागतिक सागरी जोखीम व्यवस्थापन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पनामाचा ध्वज असलेले ‘द अँड्रोमेडा स्टार’ हे जहाज ब्रिटनच्या मालकीचे असल्याचा दावा हौथीचा प्रवक्ता याह्या सारिया याने केला होता. त्यानंतरही त्याची विक्री करण्यात आली होती. असूनही ते विकले गेले. जहाजाचा सध्याचा मालकाची सेशेल्समध्ये नोंदणी झालेली आहे, असे ‘रॉयटर्स’ने सांगितले. पॅलेस्टाईनला समर्थन देत हौथी बंडखोरांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून इस्राईल, अमेरिका आणि ब्रिटनशी या देशांनी संबंधित जहाजांवर लाल समुद्र, बाब अल- मंददाद सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातात ड्रोन आणि क्षेपणास्त्राने अनेक हल्ले केले आहेत.
‘एम. व्ही. मैशा’ जवळ पडले क्षेपणास्त्र
‘यूएस सेंट्रल कमांड’ने त्यांच्या ‘एक्स’ हँडलच्या माध्यमातून या हल्ल्याबाबत माहिती दिली. हौथी बंडखोरांनी डागलेले एक क्षेपणास्त्र ‘एम. व्ही. मैशा’ या दुसऱ्या जहाजावर पडले. पण त्यात त्याचे काही नुकसान झाले नाही. लाल समुद्रात हौथींनी तीन जहाजविरोधी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यात ‘अँड्रोमेडा स्टार’चे थोडे नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.