...म्हणून बाळाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

mission corona name of baby named lockdown says modis resolution will carry forward
mission corona name of baby named lockdown says modis resolution will carry forward
Updated on

देवरिया (उत्तर प्रदेश) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्याला देशात रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान जन्मलेल्या एका मुलाचे नाव 'लॉकडाऊन' ठेवले आहे.

केंद्र सरकार जनतेच्या मदतीसाठी सातत्याने मोहीम राबवित आहे. मोदींनी घेतलेला निर्णय देशाच्या हिताचा आहे. उत्तर प्रदेशातील खुकुंदू शहरातील रहिवासी असलेल्या कुटुंबियाने मुलाचे नामकरण करताना सांगितले की, 'देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूपासून बचावाचा संदेश देण्यासाठी त्यांनी हे नाव ठेवण्याचे ठरविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी घेतलेला हा निर्णय देशाच्या हिताचा आहे.'

मुलाचे वडील पवन म्हणाले, 'पंतप्रधान मोदींचे मिशन पुढे सुरू ठेवणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता देशाचे पंतप्रधान  महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी पाळल्या पाहिजेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.